Maharashtra News | कृषी उपकरणांसाठी मिळणार सबसिडी; महाराष्ट्र सरकारची मोठी योजना


Maharashtra News | देशात पारंपारीक शेती केली जाते यातच सध्या आधूनिक शेती करण्यासाठी देशातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. दरम्यान, देशातील शेतकऱ्यांना आधूनिक शेतीसाठी मदत व्हावी म्हणुन नवनवीन यंत्रसामग्री आणि नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार कृषी क्षेत्रात वाढविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सध्या देशात शेती करताना नवीन यंत्रसामग्री तसेच नवीन तंत्रज्ञानाचा आधार करून केली जात आहे.

आता केंद्र तसेच राज्य सरकारकडून आधूनिक शेती करण्यासाठी लागणारी विविध उपकरणे हे विविध योजनांच्या माध्यमातून पुरविली जात असून ही विविध उपकरणे आणि नविन तंत्रज्ञान हे योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलं जात आहे. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, मानवाने चालणारी उपकरणे, प्रक्रिया संच, काढणी पश्चात प्रक्रिया यंत्रे, फलोत्पादन यंत्रे, स्वयंचलित यंत्रे आदींसाठी राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जात आहे.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात द्राक्षे, डाळिंब, कांदा, कापूस, ऊस आणि सोयाबीनची लागवड केली जाते. दरम्यान, या सर्व पिकांच्या लागवडीसाठी विविध प्रकारची यंत्रे वापरली जात असतात. आता राज्यातील शेतकरी गरजेनुसार या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेऊ शकणार आहेत. शेतीतील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असा दावा केला असून त्यामुळे राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

Maharashtra News | योजनेच्या अटी नेमक्या काय ?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याला एका उपकरणासाठी अनुदान दिले जाणार आहे.
  • पुढील दहा वर्षे इतर कोणत्याही उपकरणांसाठी शेतकऱ्याला अर्ज करता येणार नाही.
  • कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे ट्रॅक्टर असल्यास शेतकऱ्याला ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या उपकरणाचा लाभ मिळण्याचा हक्क असेल. मात्र यासाठी तुम्हाला ट्रॅक्टरचा पुरावा द्यावा लागेल.
  • अर्जासाठी तुम्ही कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता किंवा ऑनलाइन अर्ज करू शकणार आहात.

Maharashtra News | कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत, मशीन सबसिडीसाठी, अर्जदाराला आधार कार्ड, खरेदी करायच्या उपकरणांचे कोटेशन आणि केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने जारी केलेला तपासणी अहवाल, जात प्रमाणपत्र, स्वयं-घोषणापत्र आणि पूर्व संमती पत्र प्रदान करावे लागणार आहे.

Maharashtra News | या योजनेसाठी कसा कराल अर्ज

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर जावे. त्यानंतर तुम्ही शेतकरी योजनेवर क्लिक करावे. जर तुम्ही नवीन अर्जदार असाल तर प्रथम नवीन अर्जदार म्हणून नोंदणी करावी नंतर लॉगिन करावे. त्यानंतर राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना निवडा. त्यानंतर सबमिट वर क्लिक करावे.