Mahanand Dairy | राज्यात दुध उत्पादकांना सरकारचा दणका!


Mahanand Dairy | सध्या राज्यातील अनेक उद्योग हे बाहेरील राज्यात जात असल्याची टीका संपुर्ण राज्यातून होत असतानाच आता राज्यातील एक मोठी संस्था गुजरातमधे जाणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. महाराष्ट्र सहकारी दुध महासंघ (महानंद) ही संस्था गुजरातमधील स्थित असलेल्या राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरित करण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय ‘महानंद’ वाचवण्यात आलेले अपयश कबुल करणारा असून गुजरातमधील नामांकित कंपनी ‘अमुल’ला महाराष्ट्र राज्यात विस्ताराची संधी देत गुजरातच्या तसेच केंद्रातील नेत्यांना खूश करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सध्या राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जात आहे. यामुळे राज्यातील दुध उत्पादक शेतकरी हिताला मोठा धक्का पोहचवणारा हा निर्णय असल्याचे किसान सभेचे नेते डॉ. नवले म्हणाले आहेत.

MRSDMM (महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादीत) हे महाराष्ट्र राज्यात ऑपरेशन फ्लड कार्यक्रम राबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेलं जिल्हा व तालुका दूध संघांचे सर्वोच्च महासंघ आहे. MRSDMM ची मुख्य उद्दिष्टे सदस्य दूध संघांकडून माफक दरात दूध खरेदी करुन ग्राहकांना ते वाजवी दरात वितरित करणे हे आहे. MRSDMM अशा प्रकारे दूध उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत असते आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी आणि उन्नतीसाठी MRSDMM काम करत आहे.

दरम्यान, सध्या राज्य सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दुधाला चांगला भाव मिळावा यासाठी ‘महानंद’ मजबूत करण्याची आवश्यकता असताना महाराष्ट्राचे सरकार मात्र ‘महानंद ’ वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मुळ गुजरातमधील ‘अमूल’ कंपनीचा महाराष्ट्रात विस्तार वाढवण्यासाठी कार्यशील आहेत.

Mahanand Dairy | मुंबईतील अनेक उद्योग हे गुजरातमध्ये नेण्याचा डाव…

महाराष्ट्रातून अनेक उद्योग हे आजकाल गुजरात राज्यात स्थलांतरित केले जात असून संयुक्त महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संघर्षामुळे मुंबई शहर हे गुजरातला मिळाले नाही. त्याचा बदला म्हणुन आता मुंबई तसेच राज्यातील अनेक उद्योग हे गुजरात राज्यात नेत असल्याचे किसान सभेचे नेते नवले म्हणाले आहेत. ‘महानंद’ ही संस्था एन. डी. डी. बी. कडे हस्तांतरित केले जात असून एन. डी. डी. बी. चे मुख्य कार्यालय गुजरात येथील ‘अमूल’चे केंद्रस्थान असलेल्या ‘आणंद’ परिसरात वसलेलं आहे.