Baliraja Helpline | जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नाशिक ग्रामीण पोलीस सरसावले


Baliraja Helpline | शेतकऱ्यांसाठी राज्य तसेच केंद्र सरकार अनेक उपाययोजना करत असतात. राज्यातही शेतकऱ्यांना भासणाऱ्या समस्यांची माहीती राज्य प्रशासनापर्यंत पोहाचावी याकरीता अनेक योजना राबवण्यात येतात. यातच नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बळीराजा हेल्पलाईनची सुरुवात कारण्यात आली होती.

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्राचा वर्चस्व असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. यातच शेतकऱ्यांना भासणाऱ्या समस्या प्रशासनापर्यंत पोहचता याव्या याकरीता नाशिक ग्रामीण पोलिसांकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बळीराजा हेल्पलाईनची निर्मीती केली गेली. दरम्यान, जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आपल्या तक्रारी नाशिक ग्रामीण पोलिसांसमोर या हेल्पलाईनच्या माध्यमातून मांडण्यात आल्या.

सध्या नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही भागांमध्ये द्राक्ष काढणीचा हंगाम सुरु झाला असला तरीही मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये दरवर्षी अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारी फसवत असल्याच्या घटना समोर येत असतात. त्यामुळे आता द्राक्ष हंगामाच्या प्रारंभीलाच नाशिक ग्रामीण पोलिसांकडून ‘बळीराजा हेल्पलाईन’ सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. नाशकात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास थेट जिल्हा ग्रामीण पोलीस कक्षाकडे या हेल्पलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तक्रार करता येणार आहे.

Baliraja Helpline | शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना वाढल्याने ही सुविधा

गेल्या काही वर्षांपासून नाशकातील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढल्या असताना जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांकडे याबाबतच्या घटनांची नोंद वाढत होती. यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांकडून बळीराजा हेल्पलाईन हा उपक्रम राबवला जात असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी म्हटलेलं आहे.

त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास नाशिक ग्रामीण पोलीस शेतकऱ्यांच्या सेवेत तत्पर असल्याचे उमाप यांनी यावर्षीच्या बळीराजा हेल्पलाईनचे अनावरण करताना म्हटलेले आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी किंवा तक्रारी आता ‘बळीराजा हेल्पलाइन’ नंबरद्वारे करता येणार असून नाशिक ग्रामीण पोलिसांनी शेतकऱ्यांसाठी आता 6262 (76) 6363 ही नवीन बळिराजा हेल्पलाईन सुरू केली आहे.