Hapus Mango | आंबा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. लहानमुलांपासून वडीलधाऱ्यांपर्यंत आंबा हा सगळ्यांनाच फार आवडतो. उन्हाळ्याची चाहुल लागताच अनेक लोक हे आंब्याची वाट पाहू लागतात. त्यातच हापूस आंबा हा त्याच्या चवीमुळे भारतातच नव्हे तर इतर देशातही मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. त्यामुळे जागतिक स्तरावर हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
दरम्यान, आंबा प्रेमींसाठी एक आंनदाची बातमी असून हापूस आंबा पुण्यातील बाजार पेठेत दाखल झालेला आहे. आज पुण्यातील बाजार पेठेत रत्नागिरीचा हापूस आंबा दाखल झाला असून गेल्या काही दिवसांपुर्वी पुण्यातील बाजार पेठेत देवगड हापूस आंबा दाखल झाला होता.
Hapus Mango | देवास पहिला हापुस आंबा अर्पण करत त्यानंतर…
यातच आज पुण्यात दाखल झालेल्या हापुस आंब्याच्या पेटीला 21,000 रुपये इतकी किंमत होती. तसेच आज विधिवत पूजा करत देवास पहिला हापुस आंबा अर्पण करत त्यानंतर हापुस आंब्याचा पहीला लिलाव पार पडला. आज पुणे बाजार समितीमधील गुलटेकडी बाजारात या हंगामातील रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी विकली गेली असून ही पेटी लिलावात विकल्याने त्या हापुस आंब्याच्या पेटीला सर्वाधिक दर मिळाला.
Hapus Mango | हापूस आंब्याच्या फक्त नावानेच सगळ्यांना भुरळ
हापूस आंब्याच्या फक्त नावानेच सगळ्यांना भुरळ पडत असते आणि हापुस आंबा घेण्यासाठी ग्राहकांची पावले आपोआप वळतात मात्र बऱ्याचदा हापूसच्या नावाने इतर कोणतातरी आंबा ग्राहकांच्या माथी मारला जाण्याच्या घटना घडत असतात. परंतु, हापूस आंब्याची किंमतही ग्राहकांसाठी चितेंचा विषय असतो. कारण इतर आंब्यांच्या तुलनेमध्ये हापूस आंब्याची किंमत जास्त असते.