Goverment Scheme | केंद्र सरकारच्या या योजनेमुळे होईल वीज माफ; असा करा अर्ज


Goverment Scheme | या वर्षीच्या शेवटच्या अधिवेशनात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी २०२४ च्या अर्थसंकल्पात ‘रूफटॉप सोलर एनर्जी’ या योजनेची घोषणा केली. तर, या योजनेअंतर्गत तब्बल १ कोटी कुटुंबांना प्रत्येक महिन्याला ३०० युनिट इतकी वीज मोफत मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज योजने’बद्दल माहिती दिली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अधिकृत हँडलवरील ट्विटमध्ये त्यांनी, “नागरिकांना सौर ऊर्जा व शाश्वत प्रगतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, “शाश्वत विकास व देशातील जनतेच्या कल्याणासाठी आम्ही ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज‘ ही योजना सुरू करत आहोत. ७५,००० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुक असलेल्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट हे दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवणे आणि १ कोटी घरांना प्रकाश देणे असे आहे.(Goverment Scheme)

Goverment Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारची नवी योजना

‘पीएम रूफटॉप सोलर’ योजना काय आहे?

७५,००० कोटींपेक्षा जास्त गुंतवणुक असलेल्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट हे प्रत्येक महिन्याला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवणे आणि १ कोटी घरांना प्रकाश देणे असे आहे. दरम्यान, या योजनेमुळे नागरिकांना अधिक उत्पन्न, कमी वीज बिल व रोजगार मिळणार आहे.

Goverment Scheme | कसा कराल अर्ज..?

‘पीएम सूर्य घर: मोफत वीज’ योजनेच्या अंतर्गत छतावरील सौर पॅनेलसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर, तुम्ही पुढील पद्धतीने करू शकतात.

Farmer Scheme | शेतकऱ्यांनो…! आता घरबसल्या घ्या या योजनेचा लाभ

  • वेबसाइटवर नोंदणी करा
  • तुमच्या राज्याची निवड करा
  • तुमच्या स्थानिक वीज वितरण कंपनीची निवड करा
  • तुमचा वीज ग्राहक क्रमांक टाका
  • यानंतर कृपया संपर्क क्रमांक टाका
  • तुमचा ईमेल प्रविष्ट करा
  • वेबसाइटवर दिलेल्या सूचनांचे पालन करा
  • ग्राहक क्रमांक व मोबाइल क्रमांकाने ‘लॉग इन’ करा
  • फॉर्ममध्ये सांगितल्याप्रमाणे ‘रूफटॉप सोलर’साठी अर्ज करा
  • DISCOM च्या परवानगीसाठी प्रतिक्षा करा (Goverment Scheme)
  • एकदा तुम्हाला मान्यता मिळाल्यास, तुमच्या DISCOM सह कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून उपकरणे स्थापित करू शकता
  • यानंतर इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर, प्लांट तपशील सबमिट करा व नेट मीटरसाठी अर्ज करा
  • नेट मीटर बसवल्यानंतर व DISCOM द्वारे तपासणी केल्यानंतर, ते वेबसाइटवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल
  • यानंतर तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळेल
  • वेबसाइटद्वारे बँक खात्याचे तपशील व रद्द केलेला चेक सबमिट करा
  • यानंतर तुमच्या बँक खात्यात ३० दिवसांच्या आत सबसिडी जमा होईल.