Good News! आता शेतकऱ्यांना दिवसाही मिळणार वीज


Good News : महाराष्ट्रात कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व असून राज्यात बळीराजाला अन्नदाता म्हटले जाते. मात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकटांना सामोरे जावे लागत असते. जसे की, दुष्काळी स्थिती, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, गारपीट तसेच शासनाचे शेतकरी धोरण विरोधी निर्णय असो या सर्व कारणांमुळे शेतकरी हतबल होतो. यातच राज्यात योग्य प्रमाणात पाऊस आणि हवामानातील स्थिरता योग्य असेल तरीही शेतकऱ्यांसमोरील सर्वात मोठी अडचण म्हणजे ‘वीज कपात’ होय.

राज्यात शेतकऱ्यांसमेरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे वीज कपात असून यातच राज्यात वीज कपातीवर उपाय म्हणुन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या उभारणीत सुंपर्ण महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली असून या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी तब्बल ३ हजार ९५० हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात लवकरच प्रतिदिन ८०० मेगावॉट वीजनिर्मिती करणारा सौर ऊर्जा प्रकल्प तयार होणार असून या प्रकल्पामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होणार आहे.
सध्या शेतीला रात्री वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून या पार्श्वभूमीवर, शेतीला दिवसा किमान आठ तास वीज देण्यासाठी सरकारने यानिमित्ताने मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

Good News : माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं होतं उद्घाटन…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची सुरूवात करण्यात आली होती. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना अत्यल्प दरात वीज पुरवणार करणार असा हेतू असून शासन शेतकऱ्यांना 12 तास वीज सुविधा देणार आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळेच या योजनेची सुरू करण्यात आली होती.