Eknath Shinde | स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या बेदाण्यांचा समावेश हा शालेय पोषण आहारात करण्याच्या मागणीला यश आले असून, सरकारने याबाबतचा अध्यादेश काढला आहे. दरम्यान, आता विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात बेदाण्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना, आणखी एक मागणी केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना आणि शेतकरी संघटनांना याबाबतचा शब्दही दिला आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर एका आठवड्यात रक्कम जमा करा
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना शिंदे गटाच्या महाअधिवेशनासाठी कोल्हापुरात असून, यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी यांनी गतवर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये मिळावा या मागणीसाठी मुख्यमंत्री तथा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असता, यात झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर एका आठवड्याच्या आत रक्कम जमा करण्यास तातडीने मान्यता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.(Eknath Shinde)
Agriculture News | शेतकऱ्यांना मदत नाही; आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचं वारकऱ्यांना आवाहन
Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांची ग्वाही ..
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “राज्याच्या मुख्य सचिवांना सांगून ऊस दर नियंत्रण समितीची बैठक हि येत्या दोन दिवसांत घेतली जाईल. यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देण्याबाबत आम्ही मान्यता देऊ असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासही राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी देऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करणार असल्याचीही ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे.
गेल्या हंगामात ज्या साखर कारखान्यांनी ३ हजार रूपयांपेक्षा कमी दर दिला आहे. त्या कारखान्यांना प्रति टन १०० रूपये आणि ज्या कारखान्यांनी ३ हजार रूपयांपेक्षा जास्त दर दिला आहे. त्या कारखान्यांना प्रति टन ५० रूपये देण्याचा तोडगा देण्यात आला असून, हे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मान्यदेखील केले आहे. दरम्यान, याबाबत कोल्हापूरमधील साखर कारखान्यांनी राज्य शासनाकडे याबाबतचे प्रस्ताव सादर केले असून, राज्य शासनाने लवकरात लवकर ऊस दर नियंत्रण समितीची बैठक घेऊन तातडीने जिल्ह्यांतील साखर कारखान्यांना गेल्या हंगामातील दुसरा हप्ता देण्यासंदर्भाच्या निर्णयास मान्यता द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.(Eknath Shinde)
Goverment Scheme | केंद्र सरकारच्या या योजनेमुळे होईल वीज माफ; असा करा अर्ज
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना
यासोबतच राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी’ या योजनेमधील व नियमीत कर्जदारांच्या प्रोत्साहनपर अनुदानापासूनही वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी केवायसी आणि इतर अटीची पूर्तता केल्यास तातडीने त्यांचे प्रोत्साहनपर अनुदान हे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.