Agriculture News | बंगालच्या उपसागरातील ‘मिचॉंग’ चक्रीवादळ निवळल्यानंतरदेखील राज्यात ढगाळ हवामान असून गुरुवारी (दि. ७) पहाटे राज्याच्या अनेक भागांत दाट धुके पसरल्याचे दिसून आले होते. तर आज (दि. ८) राज्याच्या किमान आणि कमाल तापमानातील चढ-उतार होण्याची शक्यता कायम असल्याने हवामान विभागाने स्पष्ट केले.(Agriculture News)
बंगालच्या उपसागरातील ‘मिचॉंग’ चक्रीवादळ निवळल्यानंतर विदर्भ आणि छत्तीसगड परिसरावर चक्राकार वारे वाहत असून आग्नेय अरबी समुद्रात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. राज्यात दिवसभर ढगाळ हवामान तसेच पहाटेपासूनच धुक्याची दुलई, दव पडल्याचे चित्र पहायला मिळत होते. अनेक भागांत सकाळी उशिरा सूर्यदर्शन झाले तर ढगांच्या आच्छादनामुळे कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम आहेत.
नाशिक मधील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
- नाशिक २५.७ (१६.८),
- निफाड २९.८ (१५.५),
ढगाळ हवामानात रब्बी पिकांची काळजी कशी घ्याल?
मागील काही दिवस अवकाळी पाऊस आणि सद्यस्थितीतील ढगाळ वातावरण यामुळे रब्बी पिकांत रोग, किडी तसेच इतर समस्या दिसत असून यावर उपाययोजना कशा कराल यासाठी कृषी सल्ला देण्यात येत आहे. जर कापुस वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी तसेच पाऊस झालेल्या ठिकाणी भिजलेल्या कापसाची वेचणी कापूस वाळल्यानंतर करावी व वेचणी केलेला कापूस वेगळा साठवून ठेवावा.
मागील आठवडयात झालेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकात बॉंड सड दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी तसेच कापूस पिकात गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी थायमिथॉक्झाम 12.6% लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 6 मिली किंवा सायपरमेथ्रीन 25 ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करून घ्यावी.