Black Corn | महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विशेषतः उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या भागांत मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते. पण आपल्याकडे पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्याच मक्याचे उत्पादन घेतले जाते. पण तुम्ही काळ्या रंगाची मका पाहिली आहे का? या प्रजातीच्या मक्याचे कणीस हे सामान्य मक्यासारखेच असते. मात्र, या मक्याच्या कणसातील दाणे हे पूर्णपणे काळ्या रंगाचे असतात. या मक्याचे अनेक फायदे असल्याने याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच, या मक्याला साध्या मकाच्या तुलनेत जास्त भावही मिळत आहे. जाणून घ्या या मक्याचे उत्पादन कसे, कोठे आणि केव्हा घ्यावे. कसा आहे भाव, आणि मागणी…
Black Corn | या काळ्या मक्याचे वैशिष्ट्ये
तर, या काळ्या मक्याचे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये उत्पादन घेता येते. पावसाळ्यात या प्रजातीच्या मक्याच्या एका ताटाला तब्बल तीन ते पाच कणीस लागतात. तर, उन्हाळ्यात एका ताटाला २ ते ३ कणीस लागतात. ताटाची उंची चांगली असते. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मुरघास बनवायचा असल्यास हा वाण फायदेशीर ठरतो. एवढेच नाहीतर, या मक्याला सामान्य मक्याच्या बाजार भावापेक्षा कित्येक पटीने जास्त भाव मिळतो. ही मका दुर्मिळ असल्याने सध्या बाजारात याची ३०० रूपये प्रति किलो याप्रमाणे विक्री होत आहे. त्यामुळे एकूणच या मक्याचे उत्पादन घेणे हे अत्यंत फायदेशीर आहे.(Black Corn)
Onion Export Ban | भारतातील कांदा निर्यात बंदीमुळे पाकिस्तानी शेतकरी मालामाल
असे आहेत आरोग्यविषयक फायदे
या मक्यात लोह तसेच कॅल्शियमचे प्रमाण हे जास्त असल्याने ही मका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. त्यामुळे या मक्याला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या मक्यापासून लाह्या व भाकरीसुद्धा बनवता येतात. तसेच ही मका स्नायूंसाठी व हाडांसाठी उत्तम असते. काही अवजड काम केल्यानंतर या मक्याचे सेवन केल्याने थकवा कमी होतो. या काळ्या मक्याच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती वाढते व आजारांचा धोकाही कमी होतो. एकूणच ही मका आरोग्यदायी असल्याने या मक्याला बाजारात मोठी मागणी असते.
Onion Export Ban | कांदा निर्यातबंदीचा फटका द्राक्ष उत्पादकांनाही
मात्र, या काळ्या रंगाच्या मक्याचे बियाणे हे सध्या बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक शेतकरी या मक्याची लागवड करण्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, हे देशी बियाणे असल्याने हे शेतकरी देशी बियाणे संवर्धन करतात. त्यांच्याकडे हे बियाणे सहज उपलब्ध होऊ शकते.(Black Corn)