Cold Update | शेतकऱ्यांनो सावधान! दाट धुक्यामुळे ‘ही’ पिकं होऊ शकतात उद्ध्वस्त


Cold Update | सध्या देशासह महाराष्ट्रात थंडीची जोरदार लाट आलेली असून उत्तर भारतात सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे पंजाब, हरियाणा-चंडीगड, जम्मू विभागाच्या काही भागांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने म्हणजेच IMD ने वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार दाट धुके आणि थंडीमुळे पिके आणि भाजीपाला यांच्यावर परिणाम होऊ शकतो.

भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD कडून याबाबत एक सूचना जारी करण्यात आली असून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, उत्तर-पश्चिम राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, ओडिशा, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील 3 दिवसांत शेतात कीटक दिसू शकतात आणि पिंकावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून, पुढील काही दिवसांच्या कालावधीत शेतांचे सतत निरीक्षण करा.

Cold Update | बटाटे, कांदे आणि टोमॅटोमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

सध्या राज्यासह देशभरात कडाक्याची थंडी आणि दव यामुळे बटाटे, कांदे आणि टोमॅटोमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत काहीही लक्षणे पींकामध्ये दिसल्यास ताबडतोब पींकाच्या संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात. देशातील अनेक भागात धुके आणि ढगाळ हवामानामुळे बटाट्यांवर तुषार रोगाची शक्यता असून, यासाठी बटाट्याला संध्याकाळी पाणी द्यावे ज्यामुळे जमिनीचे तापमान वाढण्यास मदत होईल आणि कार्बेन्डाझिम 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

महाराष्ट्रात या कालावधीत शेतकरी कापूस वेचणीसह परिपक्व लाल हरभऱ्याची कापणी आणि रोपवाटिका पेरणी करू शकणार आहेत. तर कर्नाटकात शेतकरी पिकलेले वाटाणा, मिरची, कॉफी बीन्स, सुपारी, नाचणी आणि चवळीची कापणी करू शकतात आणि टोमॅटो, मिरची, वांगी, बीन्स आणि टरबूजाची लागवड करू शकतात.

तर दुसरीकडे, झारखंडमध्ये बटाट्यातील लवकर तसेच उशिरा येणाऱ्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी, मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी 600 ग्रॅम प्रति एकर किंवा कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63 डब्ल्यूपी 400 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. राजस्थानातील हरभऱ्यातील पोड बोअररपासून संरक्षण करण्यासाठी क्विनालफॉस २५ ईसी किंवा मॅलाथिऑन ५० टक्के ईसी १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

(टिप- ही माहीती फक्त शेतकरी हितासाठी प्रसिद्ध करण्यात आली असून याबाबात अधिक माहीती हवी असल्यास नजीकच्या कृषीतज्ञांशी संपर्क साधावा.)