Agro news | बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डर नुसार एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करून हंगाम 2022-23 मधील उर्वरित प्रति टन 100 रुपये हप्ता द्यावा. याकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांना काळे झेंडे दाखवत इशारा दिला होता. याची दखल आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली असून शिष्टाई करत 3 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक बोलावली गेली आहे. असे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सांगितले.
Agro News | वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी
शासनाने मान्यता न दिल्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांना मिळू शकले नाही
2022-23 या हंगामातील गाळप झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 100 रुपयांचा दुसरा हप्ता देण्याबाबत तोडगा निघाला होता. या प्रस्तावाला शासनाने मान्यता न दिल्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांना मिळू शकले नाही. मागील दहा महिन्यांपासून मुख्य सचिवांकडे प्रस्ताव दाखल केला असून याचा निषेध म्हणून मंत्री शहा व राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांच्या दौऱ्यावेळी आंदोलन करणार होते. बुधवारी पहाटेपासूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली व कोल्हापुरातील 800 हून अधिक कार्यकर्त्यांना या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्याबाबत नोटीस देऊन ताब्यात घेण्यात आले.
Agro News | परतीच्या पावसाने खरीप पिकाच्या काढणीत अडथळा
या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल
आता या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी 3 ऑक्टोबरच्या आत बैठक बोलावून 2022-23 मधील गाळप झालेल्या उसाला 100 रुपयांचा दुसरा हप्ता देण्यासाठी व केंद्र सरकारच्या शुगरकेन कंट्रोल ऑर्डर 1966 नुसार एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करण्याचा सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे उदय सामंतांनी सांगितले असून या चर्चेनंतर आंदोलन तात्पूर्ते स्थगित केल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. (Agro News)