Agro News | वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी


Agro News | वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून त्यांना भरपाई दिली जावी अशी मागणी या तालुक्यातील संत्रा उत्पादकांनी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सोमवारी तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन दिले आहे.

Agro News | परतीच्या पावसाने खरीप पिकाच्या काढणीत अडथळा

नुकसानीबाबत कळवून देखील कृषी विभागाकडून दुर्लक्ष

वाशिम जिल्ह्यामध्ये 700 ते 817 उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच कृषी विभागाकडे 4 सप्टेंबर रोजी मृग बहराच्या नुकसानीबाबत कळविले होते. जास्त पाऊस झाल्याने यंदा संत्रा उत्पादकांच्या नुकसान झाले आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु अजून पर्यंत मनोरा तहसीलदार कार्यालय कृषी विभागाने कुठलेही पंचनामे केलेले नाहीत.

Agro News | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून निधी जाहीर; पहा कोणाला मिळणार लाभ…

शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांवर कारवाई करून नुकसान भरपाईची मागणी

तर संत्रा उत्पादकांचे कुठलेही नुकसान झाले नाही. असा अहवाल देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी या निवेदनात केला असून निरंक अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून सरसकट नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे शाम इंगळे, मुकेश काळे, विशाल ठाकरे, हेमंत देशमुख, मनीष गावंडे, गोपाल महाराज म्हातारमारे, गोपाल ठाकूर, गजानन इंगोले, प्रमोद आढाव, अरविंद पाटील पंडित जाधव, गजानन आढाव, मनीष पवार यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी हे निवेदन तहसीलदारांना दिले आहे. (Agro News)