Bangladesh Onion Export | ३२ तासानंतर भारत-बांग्लादेश सीमेवर अडकलेले कांद्याचे ट्रक रवाना


Bangladesh Onion Export | गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू असून, यामुळे बांगलादेशच्या पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा देत देशातून पळ काढत भारतात आश्रय घेतला आहे. दरम्यान, यानंतर भारताने बांगलादेशसह आपल्या इतर सीमाही सील केल्याने भारतातून बांगलादेशात होणारी मालाची निर्यात (Export of Agricultural Produce) ही थांबवण्यात आली होती. त्यामुळे भारत-बांग्लादेश सीमेवर निर्यातीसाठी जाणाऱ्या कांद्यांचे शेकडो ट्रक अडकल्याचे वृत्त माध्यमांवर झळकत आहे. 

दरम्यान, बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारत-बांग्लादेश सीमा ही काहीकाळ सील करण्यात आली होती. त्यामुळे कांद्याचे जवळपास ७० ते ८० ट्रक हे सीमेवर अडकले होते. बांग्लादेश हा भारतीय कांद्याचा प्रमुख खरेदीदार मानला जातो. सध्या महाराष्ट्रातून जवळपास ७५% कांदा हा बांग्लादेशमध्ये निर्यात होत आहे.

Bangladesh Onion Export | दोन ते तीन दिवसात निर्यात सुरळीत होईल

निर्यातदार बांगलादेशात व्यापार करताना कुठलीही जोखीम पत्करत नाही. त्यामुळे तिकडे मालाची निर्यात करताना आगाऊ पैसे घेतले जातात, बँकांकडून ‘बँक गॅरंटी’ घेऊनच शेतमाल पाठवला जातो. हिंसाचारामुळे सध्या तेथील बँका बंद असून, दोन ते तीन दिवसात बँक सुरू होऊ शकतात. त्यामुळे बांग्लादेशमधील एकूणच हिंसाचाराची आणि सीमेवरील परीस्थिती लक्षात घेत निर्यातदारांनी तूर्तास बांग्लादेशला नव्याने माल न पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. तर, बँकांचे कामकाज सुरळीत झाल्यानंतर कांदा किंवा इतर मालाची निर्यात ही पूर्ववत होण्याची शक्यता आहे. (Bangladesh Onion Export)

Onion Export Ban | निर्यात बंदी हटवल्याने विरोधक नाराज; काय म्हणाल्या भारती पवार..?

३२ तासानंतर सीमा खुली; ४० कांद्याचे ट्रक रवाना

सोमवारी दुपारनंतर भारत-बांगलादेश सीमा बंद करण्यात आली होती. त्यामुळे रस्ते मार्गाने भारतातून जाणाऱ्या कांदा, द्राक्ष, टोमॅटो व अन्य कृषिमालांचे ट्रक हे सीमेवरच अडकून होते. सीमा बंद झाल्याने सर्व पीकांची निर्यात पूर्ण ठप्प झाली होती. दरम्यान, अखेर मध्यरात्री ३० ते ३२ तासानंतर सीमा खुली झाली आणि कागदपत्रांची छाननी करून या ४० कांद्याच्या ट्रक बांगलादेशला पाठवण्यात आल्या असून, उर्वरित ट्रकही लवकरच मार्गस्थ होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तीन ते चार दिवसांत निर्यात सुरळीत होईल

निर्यातदार बांगलादेशात व्यापार करताना कुठलीही जोखीम पत्करत नाही. त्यामुळे तिकडे मालाची निर्यात करताना आगाऊ पैसे घेतले, बँकांकडून ‘बँक गॅरंटी’ घेऊन शेतमाल पाठवला जातो. हिंसाचारामुळे सध्या तेथील बँका बंद असून, दोन ते तीन दिवसात बँक सुरूहोऊ शकतात. त्यामुळे निर्यातदारांनी तूर्तास नवीन निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. तर, बँकांचे कामकाज सुरळीत झाल्यानंतर कांदा किंवा इतर मालाची निर्यात ही पूर्ववत होईल.

Onion Export | आणखी तीन देशांमध्ये होणार कांद्याची निर्यात; यामुळे शेतकऱ्यांना किती फायदा..?

राजू शेट्टी यांचे पंतप्रधानांना पत्र 

तर, या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (Narendra Modi) पत्र लिहिले असून, यात “बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे भारत-बांगलादेशमधील दळणवळण ठप्प झाली असल्याने कांद्याची निर्यात थांबली आहे. बांगलादेशच्या या परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करावा आणि बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी तातडीने बोलणी करुन देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.