Big News | रोस्ता-रोको केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही; चांदवडमध्ये पवार कडाडले


Big News | कांदा निर्यातबंदी विरोधात शरद पवार हे मैदानात उतरलेले आहेत. आज (दि. 11)ते चांदवड मधील मुख्य चौकात बोलत होते. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. कांदा निर्यातबंदीच्या विरोधात चांदवड मध्ये आज राष्ट्रवादीचे आंदोलन पार पडले. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः उपस्थित होते. यावेळी शरद पवार हे बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत. कांदा उत्पादकांच्या हाती कमी पैसे पडतात याचा विचार सरकारने करायला हवा. कांद्यावरील निर्यातबंदी ही उठवली गेलीच पाहिजे. आम्हाला रस्त्यावर यायची हौस नाही पण त्याशिवाय दिल्लीला कळत नाही. आजच्या आंदोलनानं दिल्लीची झोप उडाली असेल. तसेच रस्ता रोको केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही.

गारपीट आणि अवकाळी मुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी. कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी. शेतकऱ्यांची ताकद काय आहे हे दाखवून द्या आणि हे नाशिक जिल्हा करूच शकतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उगीच राजकारण करु नये. उद्या आम्ही दिल्लीला जाणार आहोत तेव्हा अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहोत. सरकाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं असं चांदवडमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार बोलत होते.