Weather Update | देशात केरळसह इतर राज्यात मुसळधार पाऊस असला. तरी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पहिल्या पावसानंतर राज्यात जवळपास 86 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. दरम्यान, येत्या पाच दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह अनेक भागात सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू असून, हवामान विभागाकडून राज्यात पुढील १२ तासांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.(monsoon)
तर, अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवमान विभागाने केले आहे. राज्यात आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमेपर्यंतचे पाच जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) वर्तविला आहे. त्यानुसार, काल दुपारपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोर धरला असून, आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस बरसत आहे. (Weather Update)
Maharashtra Weather Update | उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ भागांत पुढील चार दिवस पाऊस
Weather Update | मुंबईसाठी पुढील २४ तास महत्त्वाचे
मुंबईसाठी पुढील २४ तास महत्त्वाचे असणार आहे. कारण मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविण्यात आला असून, यादरम्यान काही भागांत अति मुसळधार पावसाचीही दाट शक्यता आहे. तसेच मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, परभणी, वर्धा, अमरावती, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी केला आहे. तर, उत्तर व मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
‘या’ जिल्ह्यांमध्ये पूर परीस्थिती
तर, कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, रायगड जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरु असून आजही या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात पूर परीस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. तर रायगडसह रत्नागिरीलाही रेड अलर्ट देण्यात आला असून, कोकण पट्ट्यात पुढील काही दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Weather Update | सावधान..! आता वेस्टर्न डिस्टर्बन्सचाही धोका उद्भवणार..?
मध्यरात्रीपासून मुंबईत पाऊस
मुंबईत पुढील ३-४ तास जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता असल्याने मुंबईला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून काही भागात तर, सकाळपासून मुंबई शहरात पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईत सकाळी ५.३० वाजेपर्यंत ५१.८ मिमी पाऊस तर पश्चिम उपनगरात २७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पहाटेपासून उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे.