Tractor Subsidy | टॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार ५ लाखांचे अनुदान!


Tractor Subsidy | आजकालच्या शेतीमध्ये दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा वापर वाढताना दिसत असून शेतीकामांसाठी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तर यात प्रामुख्याने शेतीच्या पूर्व मशागतीपासून तर कापणीपर्यंत विविध यंत्रे शेतात वापरले जातात. यांत्रिकीकरणाला तसेच येत्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देखील विविध योजना राबवल्या जाता आहेत.

आता यातच एक नविन योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली असून या योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रे तसेच उपकरणाच्या खरेदीवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात होते. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आलेला असून या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. आता शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करताना ट्रॅक्टरकरिता तब्बल पाच लाखांचे अनुदान मिळणार असून पावर टिलर करिता एक लाख वीस हजार तसेच कम्बाईन हार्वेस्टर करिता आठ लाखांचे अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे. (Tractor Subsidy)

अर्ज कसा कराल?
या योजनेच्या अंतर्गत आता ट्रॅक्टर, पावर टिलर, हार्वेस्टर, नांगर तसेच पेरणी यंत्र, मल्चिंग यंत्र, मळणी यंत्र, रोटावेटर आणि चॉपकटर यासारख्या कृषी यंत्रांवर सामान्य श्रेणीत येणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजे सर्वसामान्य प्रवर्गातील (OPEN) शेतकऱ्यांना 40 टक्क्यांपर्यंत जास्तीत जास्त अनुदान मिळणार असून SC/ ST अत्यंत मागासवर्गीय प्रवर्गातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50 टक्के अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.

असा करा अर्ज-

1- या योजनेच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा. (तुम्ही तुमच्या जवळील कॉमन सर्विस सेंटरला भेट देऊन जाऊन देखील अर्ज करू शकतात.)
2- या संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेजवर क्लिक केल्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी पर्यायावर क्लिक करावे.
3- यानंतर त्या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा अर्ज करा यावर क्लिक करावे लागेल.
4- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला सात बाबी दिसतील आणि यातील कृषीयांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक करावे.
5- त्यानंतर इथे तुमची वैयक्तिक माहिती भरावी आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे गाव, तालुका, मुख्य घटकांमध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थ सहाय्य इत्यादी माहिती नमूद करावी.
6- यातील तपशीलमध्ये ट्रॅक्टर निवडावा आणि HP श्रेणीमध्ये 20 ते 35 HP पर्यंत निवडा आणि नंतर व्हील ड्राईव्ह प्रकारामध्ये 2WD/4WD यापैकी कोणतीही एका बाबीची निवड करावी तसेच त्यानंतर जतन करा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमची बाब सक्सेस होणार आहे.
या पद्धतीने तुम्ही घरी बसून अर्ज करू शकतात किंवा तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरवर जाऊन अर्ज करून या अनुदानाचा लाभ मिळवू शकतात. (Tractor Subsidy)