Shocking report | गहू-तांदळात हानिकारक आर्सेनिक आणि शिसेचं प्रमाण जास्त


Shocking report | तांदूळ आणि गहू हे भारतातील प्रमुख धान्यापैकी एक असून देशात भातशेतीखालील सर्वाधिक क्षेत्र व्यापलेले आहे. तांदुळ आणि गहु हे देशातील प्रमुख पिकं असून भारत तांदुळ आणि गहू या पिकाच्या उत्पादनात आघाडीवर आहेत मात्र आता तांदूळ आणि गव्हाबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे. भारतातील तांदूळ आणि गहू या पिकांमध्ये पोषक तत्वांची कमतरता असल्याची धक्कादायक बाब अहवालात समोर आली तसेच भारतातील तांदूळ आणि गहू या पिकांमध्ये आवश्यक पोषक तत्वांचा तुटवडा आणि हानिकारक घटकांची वाढ झाली आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी एका संशोधनानंतर केलेला आहे. 

काय आहे धक्कादायक अहवाल?

शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, भारतातील गहू आणि तांदूळ यासारख्या पिकांमध्ये पोषकतत्त्वांची कमतरता आढळून आली असून शास्रज्ञांच्या एका पथकाने या संशोधनानंतर एक अहवाल जारी केलेला आहे. तांदुळ आणि गहू या धान्यातील कॅल्शिअम, लोह आणि झिंक यासारखे पोषकतत्वांमध्ये घट झाल्याचं दिसुन आलं. देशातील धान्यातील आवश्यक आणि पोषकतत्वांमध्ये सुमारे 19 ते 45 टक्के घट झाल्याचा दावा या अहवालात करण्यात आलेला आहे. यामुळे आता देशातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. (Shocking report)

काय असतं आर्सेनिक आणि शिसे?

Journal Scientific Reports मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, सध्या वापरल्या जाणार्‍या गव्हामध्ये 1960 च्या गव्हाच्या तुलनेत आर्सेनिक आणि क्रोमियमची पातळी कमी झाली असताना आताच्या धान्यामध्ये हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. आर्सेनिक आणि शिसे याचं हे अधिक प्रमाण हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असून संशोधकांनी 1960 ते 2010 पर्यंत तांदूळ-गहू पिकांच्या धान्य रचनेचा अभ्यास केला.

शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा

आर्सेनिक-शिसे याचं हे अधिक प्रमाण हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असते. मानवी हाडांच्या निर्मितीसाठी आणि विकासासाठी कॅल्शियम आणि हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोह आवश्यकता असून तसेच, प्रतिकारशक्ती, प्रजनन आणि न्यूरोलॉजिकल आरोग्यासाठी झिंक महत्त्वाचे असते. त्यामुळे धान्यांमध्ये पोषक तत्वांची कमतरता झाल्यास त्याचा शरीरावरही परिणाम होऊ शकतो.