Rain Update | यावर्षी ‘या’ महिन्यात दाखल होणार मान्सून


Rain Update | यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठीही पाणी नाही, अशी स्थिती आहे. तसेच शहरी भागातही आतापासूनच धारणांनी तळ गाठला आहे. यावर्षी अशी स्थिती असण्याचे कारण म्हणजे २०२३ हे वर्ष ‘अल निनो’ चे वर्ष होते. मात्र, यावर्षी म्हणजेच २०२४ मध्ये पावसाळा हा लवकर दाखल होणार असून, यामुळे नक्कीच नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर, जाणून घेऊयात की यंदा पाऊस कधीपर्यंत दाखल होऊ शकतो आणि काय आहे अल निनो..?

२०२३ हे वर्ष उष्ण हवामानाचे वर्ष ठरले असून, ‘अल निनो’चा प्रभाव हा यावर्षी जूनपर्यंत समाप्त होण्याचा, अंदाज हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. गेले वर्ष जरी उष्ण असले किंवा गेल्या वर्षी पाऊस कमी असला, तरी या वर्षी दमदार पावसाची दाट शक्यता आहे. दोन जागतिक स्तरावरील हवामान संस्थांनी मागील आठवड्यात जाहीर केले आहे की, जगातील हवामानावर परिणाम करत असणारा अल निनो हा आता कमकुवत होताना दिसत आहे. तर, या वर्षी ऑगस्टपर्यंत ‘ला नीना’ची स्थिती निर्माण होऊ शकते.(Rain Update)

Rain Alert | ‘या’ भागात बरसणार अवकाळी..

दरम्यान, या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी जून ते ऑगस्टपर्यंत ‘ला निना’ची स्थिती निर्माण झाली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचा पाऊस हा चांगल्या प्रमाणात होईल, असे सांगितले आहे. यावर्षी जून-जुलैपर्यंत ‘ला निना’ स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी सांगितले आहे.

Rain Update | काय आहे ‘अल निनो’?

प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढण्याची प्रक्रिया म्हणजे ‘अल निनो’. या ‘अल-निनोच्या प्रभावामुळे देशात मान्सूनचे चक्र विस्कळीत होत असते. तसेच यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळजन्य तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते.

Rain Update | शेतकऱ्यांनो सावधान! राज्यात पुन्हा अवकाळी बरसणार

नैऋत्य मान्सून कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा

भारतातील वार्षिक पर्जन्यापैकी तब्बल ७०% पाऊस हा नैऋत्य मान्सूनमधून येतो, जो कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. जीडीपीमध्ये त्याचा वाटा हा सुमारे १४% असून, देशाच्या १.४ अब्ज इतक्या लोकसंख्येपैकी अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना याद्वारे रोजगार मिळत असतो.(Rain Update)