PM Kisan Yojna | भारताच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा भाग म्हणजे कृषी क्षेत्र असून सध्या भारतासह महाराष्ट्रात शेती आधुनिकिकरण तसेच शेतीला तंत्रज्ञानाची जोड देण्याकडे राज्य तसेच केंद्र सरकार भर देत असल्याचं चित्र आहे. यासाठी देशासह राज्यात अनेक योजना राबवल्या जातात आणि यातच देशातील प्रमुख मानली जाणारी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान निधी योजना ही आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या असून या योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान निधी योजना (PM-Kisan Samman Nidhi Yojna) ही योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी 6000 रुपये देेशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जोण्यात येते. देशातील अल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान निधी योजना (PM-Kisan Samman Nidhi Yojna) सुरु केलेली आहे.
PM Kisan Yojna | मोदी सरकार महिला शेतकऱ्यांसाठी बंपर योजना आणणार
दरम्यान, या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर येत असून 2024 मध्ये पीएम-किसान योजनेचा लाभ दुप्पट होणार असल्याची माहीती मिळत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असून, या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात. दरवर्षी सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारचे मुख्य लक्ष शेतकऱ्यांवरच केंद्रीत असते. दरम्यान, मोदी सरकार महिला शेतकऱ्यांसाठी बंपर योजना आणणार असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधीची रक्कम वार्षिक 6 हजार रुपयांवरून 12 हजार रुपयांपर्यंत वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याशिवाय, केंद्र सरकार 21 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्या महिलांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी रोख लाभ हस्तांतरण योजना आणण्याची योजना असून सध्या याची जोरदार चर्चा सुरू असली तरी भविष्यात त्याची अंमलबजावणी होणार की नाही हा प्रश्न अद्याप गर्भात आहे. दरम्यान, आजतागायत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर २.८ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) महिला कामगारांनाही प्राधान्य दिले जाणार असून सध्या मनरेगामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा वाटा ५९.२६ टक्के आहे, जो २०२०-२१ मध्ये ५३.१९ टक्के होता. महिला शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधीची रक्कम दुप्पट केल्याने सरकारवर 120 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडू शकतो. या योजनेंतर्गत आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत. या अंतर्गत देशभरातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2.8 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
PM Kisan Yojna | मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक
सूत्रानुसार, भाजप सरकार सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या भाजप पक्षासाठी महिला हा महत्त्वाचा आधार राहिलेला आहे. 2023 च्या अखेरीस, भाजप पक्षाने अपेक्षेपेक्षा जास्त केले आणि चार प्रमुख राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये, विशेषत: मध्य प्रदेशमध्ये, जिथे महिलांनी भाजपच्या बाजूने प्रचंड मतदान केले आणि तेथे मोठा विजय मिळवला. त्यामुळे केंद्र सरकार आता महिलांसाठी पुन्हा एकदा एक मोठी घोषणा करणार अशी चिन्ह आहेत.