Onion Rate | आज राज्यातील बाजार समितीमध्ये 1 लाख 29 हजार 588 क्विंटल कांद्याची आवक झाली असून यात सोलापूर बाजार समिती 50 हजार तर नाशिक बाजारात 34 हजार, मुंबई बाजारात 13 हजार क्विंटलचे अवघड झाली तसेच आज कांद्याला कमीत कमी 1750 रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.
Onion News | परतीच्या पावसामुळे कांद्याला फटका; पाणी, दर असूनही पिक घेण्यात अडचणी
नाशकात आज कांद्याला काय दर मिळाला
पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला बाजार समितीत उन्हाळा कांद्याला 4,900 रु., लासलगाव बाजार समिती 4,500 रु., कळवण बाजारात 5,300 रु., पिंपळगाव बसवंत येथे 5,550 रुपये तर दिंडोरी-वनी बाजारात 5,000 रु. असा दर मिळाला. तसेच पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 4 हजार रुपयांचा दर मिळाला.
Onion Rate | शेतकऱ्यांचा उन्हाळा कांदा विक्रीवर भर; दरात चढ-उतार कायम
मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला 3,850 रु. दर
त्याचबरोबर, सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला 2 हजार रुपये येवला बाजार समिती 2,300 रु. लासलगाव बाजार आणि 4,300 रु., जळगाव बाजारात 1,750 रु., नागपूर बाजारात 3,400 रु. तर मनमाड बाजारात 2,800 रुपये असा दर मिळाला. त्याचबरोबर आज पुणे बाजारात लोकल कांद्याला 4,250 रुपये, मंगळवेढा बाजार समितीत 2,700 रु. नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 3,650 रुपये असा दर मिळाला आहे. तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला 3,850 रुपये दर मिळाला. (Onion Rate)