Onion News | इजिप्त आणि तुर्कीमधून आयात केलेल्या कांद्याच्या गुणवत्ता व दरात ताळमेळ नाही


Onion News | राज्यामधील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळा कांद्याची आवक कमी झाल्याने अत्यंत कमी प्रमाणात नवीन खरीप कांदा बाजारात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा मर्यादित असल्यामुळे कांद्याचे दर टिकून आहेत. त्यात गेल्या पंधरा दिवसात पावसामुळे कांद्याचे प्रचंड नुकसान झाले असून दरम्यान, देशात इजिप्त व तुर्की मधील कांदा भारतात दाखल झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Onion News | सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; सरासरी भावात 700 रुपयांनी घट

भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी परदेशातून कांदा आयात

केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्याकरिता कांदा उपलब्धतेसाठी भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन संस्थांच्या माध्यमातून पावणे पाच लाख टन कांदा खरेदी केली आहे. तर हा बफर स्टॉकमधील कांदा बाजारात येत असताना कांदा सरकारने आयातीला परवानगी दिल्याने केंद्र सरकारच्या धोरणावर टीका होत आहे. ग्राहकांना स्वस्त दरात कांदा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडून यापूर्वी वाणिज्य ग्राहक व्यवहार व अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून वेळोवेळी हस्तक्षेप केला गेला आहे. त्यातच कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तान पाठोपाठ आता तुर्कीतूनही पाच कंटेनर कांदा भारतात दाखल झाला आहे.

24 सप्टेंबर रोजी पहिल्यांदा अफगाणिस्तानातील 300 टन कांदा 11 ट्रकमधून रस्तेमार्गे पंजाब राज्यातील अमृतसर व जालिंदर या शहरांमध्ये दाखल झाला होता. आता दुसऱ्यांदा इजिप्त व तुर्की मधून 120 टन कांदा दाखल झाला असून पुण्यातदोन, बंगळूर मध्ये दोन व मुंबईमध्ये एक कंटेनर कांदा पाठविण्यात आला आहे.

Onion News | अफगाणिस्तान नंतर आता तुर्की आणि इजिप्त मधून 120 टन कांद्याची आयात

आयात दराला किलोमागे तीन ते चार रुपये तोटा

बंदरावर उतरल्यानंतर या कांद्याची आयात किंमत 32 ते 34 रुपये किलो होती. हा कांदा विक्रेत्यांना पोहोचेपर्यंत त्याची किंमत प्रति किलो 42 रुपये पर्यंत गेली आहे. मात्र किरकोळ विक्री 35 ते 38 रुपये दरम्यान झाली. त्यामुळे आयात दराला किलोमागे तीन ते चार रुपये तोटा झाला असून आयात झालेल्या कांद्याच्या बाजारातील परिस्थिती अनुकूल नसून गुणवत्ता व दरात ताळमेळ बसत नाही. त्यामुळे आयात होऊन देखील हा कांदा फायदाचा नसल्याचे हार्टीकल्चर प्रोड्यूसर एक्सपोर्ट, असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितले. (Onion News)