Onion News | बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून 300 टन कांद्याची आयात; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट


Onion News | देशाभरात कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून परदेशातून कांदा आयात करण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातून पंजाबातील अमृतसर आणि जालींदर या शहरात 11 मार्ट्रकमधून कांदा दाखल झाला आहे. तर कांद्याने भरलेले 45 ते 50 उर्वरित ट्रक बॉर्डर वर उभे असल्याने दोन-तीन दिवसात मोठ्या प्रमाणात भारतात अफगाणिस्तानचा कांदा दाखल होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत पाच लाख टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. हा कांदा देशातील मेगामेट्रोसिटी असलेल्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, भुवनेश्वर सारख्या शहरांत 30 ते 35 रुपये किलो प्रमाणे विकला जाणार आहे.

कांदा बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचा निर्णय

कांद्याचे दर नियंत्रणात येत नसल्यामुळे केंद्र सरकारने प्रदेशातून कांदा आयातिला परवानगी दिली. ज्यामधून अफगाणिस्तानातून पंजाबमधील अमृतसर व जालिंदर या शहरात 300 टन कांदा दाखल झाला आहे आणि आणखी मोठ्या प्रमाणात कांदा दाखल होण्यासाठी भारतीय सीमारेषेवर 45 ते 50 ट्रक उभे आहेत. परंतु राज्य सरकारच्या या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मात्र संताप व्यक्त केला जातोय.

“सरकारच्या या निर्णयाचे पडसाद विधानसभेत उमटणार”

“सततच्या पावसाने आधीच साठवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. दोन रुपये मिळतील या उद्देशाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काढलेला कांदा चाळीत साठवला आहे. पावसाने कांदा सडत असल्यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च 25 ते 30 रुपयांपर्यंत गेला असून आज कुठेतरी पाच ते सहा रुपये किलोला शेतकऱ्यांना नफा मिळत असतानाच सरकारने परदेशातून कांदा आयात करणे योग्य नसून, त्याचे परिणाम लोकसभेप्रमाणे विधानसभेतही कांदा उत्पादक शेतकरी दाखवल्याशिवाय राहणार नाही.” असा इशारा शेतकरी बचत गट व कांदा उत्पादक अध्यक्ष निवृत्ती न्याहारकर यांनी दिला.

“कांद्याच्या जास्तीत जास्त निर्यातीकडे सरकारीने लक्ष द्यावे”

काही दिवसांपूर्वी ‘नाफेड’च्या माध्यमातून ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ने खरेदी केलेला कांदा बाजारात आणला. ज्यामुळे बाजार भाव थोडाफार नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न होता. परंतु 24 सप्टेंबरला केंद्र सरकारने आपला कांदा असतानाही अफगाणिस्तानातून दोन ट्रक कांदा पंजाब मधील जालिंदर येथे आयात केला. चांगला बाजारभाव आणि शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकचे कसे मिळतील हे लक्षात ठेवून त्याकरिता जास्तीत जास्त कांदा निर्यात कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे लासलगावचे कांदा निर्यातदार प्रवीण कदम म्हणाले.

“महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला कुठेतरी चांगला दर मिळत होता. त्यात केंद्र सरकार कांदा निर्यातीवर 20% शुल्क घेत असताना देखील अफगाणिस्तानातून कांदा आयात करण्यास परवानगी देण्यात आली. यामुळे पंजाबमध्ये कांदा दाखल होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने कांद्याचे आयात थांबवावी. उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. तेव्हा आमची त्यांच्याकडे मागणी आहे अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना या विरोधात निषेध दर्शवतीवर आंदोलन करेल.”

भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना