Onion News | नगरमध्ये प्रतिक्विंटल कांद्यावर 300 ते 400 रुपयांची दरवाढ


Onion News | नगर जिल्ह्यामध्ये गावरान कांद्याची आवक होत असून बाजारामध्ये मागील 8 दिवसांपासून प्रतिक्विंटल कांद्यावर साधारण 300 ते 400 रुपयांपर्यंत दरबाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल 1500 ते 5200 रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. नगर मधील दादा पाटील शेळके कृषी उत्पादन बाजार समितीच्या भानुदास कोतकर नेप्ती उपबाजारात गुरुवार, सोमवार आणि शनिवारी कांद्याचे लिलाव होत असतात. 9 सप्टेंबर रोजी ५९००० गोण्यांची विक्री होऊन, 1300 ते 4300 रुपये व सरासरी 3600 रुपये दर मिळाला आहे.

Agro News | ‘सरकारने योजना भ्रष्टाचार करण्यासाठी काढल्यात का?’; बच्चू कडूंचा सरकारला संतप्त सवाल

निर्यातशुल्क हटवल्यामुळे दरात वाढ

तर 12 सप्टेंबर रोजी कांद्याची 49 हजार गोण्यांची नेप्ती बाजारात आवक झाली होती. तेव्हा प्रतिक्विंटल 1200 ते 4300 व सरासरी 3650 रुपये का दर मिळाला होता. कांद्यावरील निर्यातशूल्क हटवल्यानंतर काही प्रमाणात दरवाढ झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र 14 सप्टेंबरच्या लिलिवात कांदा दरात बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसून आले. त्या दिवशी जवळजवळ 50000 कांदा गोण्यांची आवक होऊन एक नंबरच्या कांद्याला 4500 ते 5300 तर दोन नंबरच्या कांद्याला 3700 ते 4500 रुपये, तीन नंबरच्या कांद्याला 2700 ते 3700 व चार नंबरच्या कांद्याला 1500 ते 2700 रुपयांचा दर मिळाला. तर हा दर सरासरी 4000 च्या पुढे होता. 18 गोण्यांना 5500, 20 गोण्यांना 5400 व 7 गोण्यांना 5300 रुपये दर मिळाला.

Agro News | कर्नाटकच्या कांद्याची आवक वाढली; दरांमध्ये चढ-उतार??

तर राहुरी बाजार समितीमध्ये 17000 गोण्यांची आवक झाली असून 1000 ते 5000 रुपयांचा दर मिळाला आहे 14 गोळ्यांना 5000 रुपये, आठ गोण्यांना 4925 रुपये, 11 गोण्यांना 4850, 12 गोण्यांना 4800 रुपये दर मिळाला आहे. येथे सरासरी चार हजारांचा दर मिळाला असून पारनेर, अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव बाजार समितीतही कांद्याला 5000 पर्यंत दर मिळत आहे. (Onion News)