Farmers Scheme | शेतकऱ्यांचा विजेचा खर्च कमी करण्यासाठी ‘ही’ योजना सुरू


Farmers Scheme | देशात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. राज्य तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत असातात. दरम्यान, पीएम कुसुम योजना (PM Kusum Yojna) अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना अनुदान देत असते. तथापि, राज्यांनुसार अनुदानाची ही रक्कम बदलू शकते. या योजनेच्या मदतीने शेतकरी नापीक जमिनीतही सोलर पंप लावून शेती करू शकतात.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM Kusum Yojna) योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी 60 टक्के अनुदानावर सौर पंप बसवण्यासाठी 168.63 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम जमा केली आहे. सौरपंपांच्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने गेल्या वर्षी सोलर पॅनलच्या निविदा दरात १८ ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळे शेतकर्‍यांच्या वाट्याचा बोजा शेतकर्‍यांवर वाढत होता.

पीएम कुसुम योजनेची लोकप्रियता लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकर्‍यांना सौरपंपाच्या किमतीवर 60 टक्के अनुदान देण्यास परवानगी दिली असून, त्यापेक्षा जास्तीची किंमत वाढवली आहे. शेतकऱ्यांना सोलर पंप बसवून डिझेल आणि विजेची बचत होईल आणि राष्ट्रीय स्तरावर कार्बनची तीव्रता कमी होणार आहे. या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना सौरपंप बसविण्यासाठी अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे 4 ते 5 एकर जमीन असणे आवश्यक आहे.

Farmers Scheme | अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक…

१-आधार कार्ड
२- रेशन कार्ड
3- बँक खाते पासबुक
4- आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक
5- जमिनीची कागदपत्रे
6- पासपोर्ट आकाराचा फोटो.

Farmers Scheme | अर्ज कसा करायचा?

शेतकरी त्यांच्या राज्यातील शेतकरी पोर्टलला भेट देऊन पंतप्रधान कुसुम योजनेसाठी अर्ज करू शकतात. ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवरूनही अर्ज करता येतो. शेतकऱ्यांना हवे असल्यास १८००-१८०-३३३३ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळू शकते.