सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुका काँग्रेस पक्षातर्फे शासनाने शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२६) रोजी देवळा पाच कंदील येथे लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. याबाबत येथील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन सादर केले आहे.
सदर निवेदनाचा आशय असा की, देशात कोणीही उपाशीपोटी झोपू नये. प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता, न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करून अन्न धान्य पिकवतो. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपल्या देशातील बहुतांशी उदयोग धंदे, पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर आवलंबून आहे.(Deola)
Deola | इटलीच्या शेती अभ्यासकांची देवळ्यातील शेतकऱ्याच्या डाळींब बागेला भेट
शेतकऱ्यांनी शेती करणे थांबविल्यास सर्व जनजीवन उद्धवस्त होईल. ‘शेतकरी जगेल तरच देश जगेल’ असे असतानाही केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी वर्ग बेजार झालेला असताना शासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी कुठलेही ठोस पावले उचलले जात नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आलेला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, बेमोसमी पाऊस यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जातून मुक्ती व्हावी. याकरिता देवळा तालुका काँग्रेस पक्षातर्फे आज शुक्रवारी (दि.२६) रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत देवळा पाचकंदील येथे एकदिवसीय उपोषण करण्यात येत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यात तालूका अध्यक्ष दिनकर निकम, समन्वयक स्वप्नील सावंत, कार्याध्यक्ष दिलीप आहेर, प्रांतिक सदस्य दिलीप पाटील, अरुणा खैरनार आदींसह संजय साळवे, पंडित निकम, संजय पवार, कैलास शिरसाट, प्रवीण सूर्यवंशी, बाळासाहेब खैरनार, गणेश देवरे, तुषार शिंदे, विनोद आहेर आदींनी यांनी सहभाग नोंदवत उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवला.(Deola)
Deola | देवळा बाजार समितीत कांदा लिलावाचा शुभारंभ; उन्हाळी कांद्याला सर्वाधिक भाव