Corn Crop | मका पीकाला पावसाचा फटका; देवळा तालुक्यातील मका क्षेत्राची केंद्रीय पथकाकडून पाहणी


सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवार (दि. ११) रोजी देवळा येथील शिवारातील मका पिकाची पाहणी केंद्रीय एकीकृत नाशीजीव प्रबंधन केंद्र, नाशिक आणि कृषी व किसान कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या अधिकारी वर्गाने केली. पाऊस कमी असल्याने या अळीचा प्रादुर्भाव असून त्यावर काय आणि कशी उपाययोजना करावी याबाबत शेतकऱ्यांत जनजागृती करण्यात आली.

Corn Crop | कसमादे भागात सर्वाधिक क्षेत्रावर मका पीक

कसमादे (kasmade) भागातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक क्षेत्रावर मका पीक घेतले आहे. मात्र मका पिकावर लष्करी अळी दिसू लागल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. याची ओरड लक्षात घेऊन कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी देवळा (Deola) तालुक्यातील मका क्षेत्राला भेट देत पाहणी केली. यात केंद्रीय एकीकृत नाशीजीव प्रबंधन केंद्राचे उपसंचालक डॉ.अतुल ठाकरे, सहाय्यक वनस्पती संरंक्षण अधिकारी अमित जाधव, वनस्पती संरक्षण अधिकारी विशाल काशीद, वैज्ञानिक सहाय्यक महेश सावंत यांच्यासह येथील कृषी पर्यवेक्षक विजय व्हलगडे, कृषी सहायक मनीषा जाधव उपस्थित होते. (Corn Crop)

Black Corn | पिवळ्या नाही काळ्या मक्याचे उत्पादन घ्या; बजारात मोठी मागणी

याशिवाय कृषी विज्ञान केंद्र वडेल ता. मालेगाव येथील शास्त्रज्ञ विशाल चौधरी, उपविभागीय कृषी अधिकारी रुपेश खेडकर, कृषी अधिकारी अशोक डमाळे यांच्यासह तालुक्यातील अधिकारी यांनीही भऊर, वाजगांव, खुंटेवाडी, मटाणे, खर्डे, देवळा येथील मका पिकाची पाहणी केली व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांनी यासाठी १०३५ किलो इमामेक्टीन बेंझोएट या किटकनाशकाची ५० टक्के अनुदानावर उपलब्धता केली आहे. याचे उपस्थित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. याकामी शेतकऱ्यांनी संबंधीत कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सीताराम चौधरी यांनी केले आहे. तसेच या अळीचा जीवनक्रम, तिची वाढ, स्थान, कीड नियंत्रण व्यवस्थापनाची पद्धत, सार्वत्रिक स्तरावर फवारणी याबाबतही माहिती देत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी येथील युवा शेतकरी किरण भामरे, गणेश आहेर, राजेंद्र देवरे, अनिल आहेर यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.(Corn Crop)

Crop Insurance | पिक विमा मिळाला नाहीतर…; शेतकऱ्यांसाठी शिंदे गटाचे आमदार आक्रमक