Cold Day Alert | सध्या संपुर्ण देशातील हवेतील गारवा वाढत असून देशातील अनेक राज्यांत थंडीने कहर केल्याचं दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात सध्या थंडीने अंग थरथर कापले असून आयएमडीने 13 ते 15 जानेवारी दरम्यान राज्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, या काळात देशातील काही ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मकर संक्रांतीनंतर म्हणजेच १५ जानेवारीनंतरच थंडीपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आज शनिवार, देशातील अनेक भागात १३ जानेवारी रोजी हलका सूर्यप्रकाश असेल, परंतु पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे थंडी वाढू शकते. वायव्येकडून निर्माण झालेल्या चक्रीवादळ पश्चिम विक्षोभाच्या प्रभावामुळे १५ जानेवारीपर्यंत थंडीपासून सुटका मिळण्याची शक्यता नाही.
यातच, उत्तर प्रदेशातील कानपूर शहरामध्ये गेल्या 24 तासांत हंगामातील सर्वात थंड दिवस राहिला. येथील किमान तापमान ३ अंश सेल्सिअसवर पोहोचले. दरम्यान, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊसह गाझियाबाद, वाराणसी, नोएडा, मेरठ, प्रयागराज, कानपूर, मुरादाबाद, ग्रेटर नोएडा, हापूर, बरेली, मुझफ्फरपूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रकोप वाढलेला आहे. पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे. थंडीमुळे उत्तर भारतातील लोकांना घरांमध्ये लपून राहावे लागले आहे. उत्तर प्रदेशातील लोक थंड वाऱ्यामुळे थरथर कापत आहेत.
Cold Day Alert | कानपूरमधील सर्वात थंड दिवस
यूपीमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमानात कमालीची घट दिसून आली आहे. शुक्रवार हा राज्यातील सर्वात थंड दिवस ठरला असून किमान तापमान 8 अंश सेल्सिअस ते 3 अंश सेल्सिअस दरम्यान होते. कानपूरमध्ये हा हंगामातील सर्वात थंड दिवस होता, येथील किमान तापमान ३.० अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्यामुळे कानपुर शहरात IMD ने जारी केला ‘कोल्ड डे’ अलर्ट जारी केला आहे.