Big News | वाढती महागाई पाहता सरकारने केली मोठी घोषणा


Big News | यंदा महाराष्ट्रात अत्यल्प पाऊस झाल्याने याचा मोठ्या प्रमाणात परिणाम कृषी क्षेत्रावर झाला आहे. यावर्षी अनेक उत्पादनांमध्ये घट झाली असून यामुळे अनेक उत्पादनांच्या किमंतीत वाढ होत आहे. याच वाढत्या महागाईमुळे सरकारची चिंता वाढताना दिसत आहे. मैदा, डाळ, तांदूळ, गहू, भाजीपाला या सर्व वस्तूंच्या किमतींमध्ये घट करता यावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

७ डिसेंबर रोजी भारतात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली आहे. तसेच केंद्र सरकारने तांदळाचीदेखील निर्यातबंदी केली असून यंदा देशात अनेक नैसर्गिक संकटांमुळे शेती पिकांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. यातच तांदुळ, गहू तसेच डाळी यांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्य नागरीकांना याचा फटका बतस आहे.

यावर्षी तांदुळ, गहू तसेच डाळी यांचं उत्पादन कमी असल्याने दरात सातत्याने वाढ होत असून ही वाढती महागाई कमी करण्यासाठी सरकारने 2025 पर्यंतचा मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. सतत वाढत्या महागाईचा विचार करता केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळीला दिलेली सूट पुढील आणखी एका वर्षासाठी म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 2025 आणि त्यानंतरदेखील डाळींच्या किंमतीत वाढ होणार नाही, अशी मोठी घोषणा डीजीएफटीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.

Big News | केंद्र सरकारचा महागाई कमी करण्याचा प्रयत्न

देशातील सतत बदलत असणाऱ्या वातावरणाचा परिणाम हा शेती पिकांच्या उत्पादनावर होत असून या उत्पादनाच्या टंचाईचा अंदाज घेत केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात तूर आणि उडीद डाळीसाठी शुल्कमुक्त आयात धोरण हे 31 मार्च 2024 पर्यंत वाढवलेले ​​होते. तसेच सरकारने 2 जून रोजी व्यापारी वर्गाला तूर आणि उडीद डाळींचा मर्यादित साठा ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. या निर्णयानंतर सरकारने दरवाढ रोखता यावी यासाठी राष्ट्रीय बफर स्टॉकमधून तूर सोडण्यात आली होती आणि आता हा सूट आणखी एका वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.  

वाढत्या महागाईने सरकारची वाढली डोकेदुखी

भारत हा तांदूळ आणि डाळींचा मोठा उत्पादक देश असून भारतात तांदूळ आणि डाळींच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत असताना सरकारच्या मात्र अडचणी वाढताना दिसत आहे. नुकतंच सरकारने तांदूळ कारखान्यांना तांदळाच्या किंमती कमी करण्याचे आदेश दिले असताना आगामी निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर भारतातील वाढती महागाई पाहता केंद्र तसेच राज्य सरकारची चांगलीच डोकेदुखी वाढल्याचं म्हटलं जात आहे.