Agriculture News | शेतकऱ्यांना मदत नाही; आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचं वारकऱ्यांना आवाहन


Agriculture News | भारत हा देश कृषी प्रधान देश म्हणुन ओळखला जातो. तसेच महाराष्ट्र राज्यातही कृषी क्षेत्र हे विकासाच्या दृष्टीने आगेकूच करत आहे. मात्र असं असताना देखील राज्यात होणारे हावामानातील बदल, आस्मानी संकटे, शासनाचे शेतकरी विरोधी अनेक धोरणे या आणि अशा अनेक कराणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

राज्यात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जात आपल्या परिस्थिशी लढावं लागत आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाचे शेतकरी विरोधी निर्णय, योजनांची फक्त घोषणाच, कधी दुष्काळ तर अवकाळी पाऊस अशा अनेक इतर गोष्टींमुळे शेतकरी आणि त्याचे कुटुंब अगदी मेटाकूटीला येतात यातच या सर्व त्रासाला कंटाळून शेतकरी आत्महत्या यासारखे टोकाचे पाऊल उचलतात.

दरम्यान, राज्यातील शेतकरी आत्महत्येत झपाट्याने वाढणारी संख्या रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना हरिनाम सप्ताह घेण्याचा सल्ला दिलेला आहे. त्याचनिमित ठाणे जिल्ह्यातील मलंगगडाच्या पायथ्याशी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राजस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत करण्यात आला असताना मुख्यमंत्री शिंदें या कार्यक्रमाला उपस्थितत होते.

Agriculture News | ज्या भागात शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या भागात प्रबोधन करा..

यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यात वारकरी संप्रदाय हा खूप मोठा असून तो समाज प्रबोधन करण्यासाठी हा वारकरी समाज महाराष्ट्रात ओळखला जातो. म्हणूनच ज्या भागात शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या भागात हरिनाम सप्ताह घेऊन त्यांचे प्रबोधन करा, अशी मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकऱ्यांना विनंती केली आहे. 

राज्यातील शेतकऱ्याला अनेक संकटांना सामोरं जात आपली उपजिविका करावी लागते. यातच निसर्ग बळीराजाची कसून परीक्षा पाहतो. दरम्यान, नुकसान झाल्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी इतकीच अपेक्षा शेतकऱ्यांची असते मात्र तरीही सध्या नाशिक जिल्हामधील सात तालुक्यातील ८७४ गावे हे दुष्काळी नुकसान भरपाईपासून अजूनही वंचित आहेत. अशा गंभीर परिस्थितीत मदत जाहीर न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी प्रबोधन करा असं सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा अशी तीव्र नाराजी शेतकरी करत आहेत.