Agriculture Jobs | देशातील वाढतं आधुनिकीकरण यामुळे सध्या देशातील तरुणाईने कृषी क्षेत्राकडे पाठ फिरवलेली दिसत असून देशातील तरुणाई कृषी क्षेत्राकडे वळावी याकरीता केंद्र तसेच राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. यातच आजकाल शेतीविषयक अभ्यासक्रमाकडो तरुणाईचा वाढता कल पाहता बिहारमधील शेतीचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
बिहार राज्यात कृषी विभागात 1051 पदांसाठी पुनर्स्थापना होणार असून यासाठी शेतीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणांना बिहार लोकसेवा आयोगाकडून नोकरी मिळण्याची चांगली संधी उपल्ब्ध झाली आहे. बिहार राज्यात कृषी विभागात एक हजाराहून अधिक अधिकारी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 15 जानेवारी 2024 पासून या रिक्त पदांसाठी नोंदणी सुरू होणार असून तुम्हीही कृषी शाखेचे विद्यार्थी असाल आणि नोकरीची संधी मिळवू इच्छित असाल तर त्याबद्दलची सर्व माहिती जाणून घ्यावी.
Agriculture Jobs | रिक्त पदे खालीलप्रमाणे-
एकूण 1051 पदांवर जागा रिक्त –
- कृषी उपसंचालक – १५५ पदे
- सहाय्यक संचालक (कृषी अभियांत्रिकी) – १९ पदे
- सहाय्यक संचालक (वनस्पती संरक्षण) – ११ पदे
- ब्लॉक कृषी अधिकारी– 866 पदे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी आहे.
Agriculture Jobs | कुठे करावा अर्ज?
तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) वेबसाइटला भेट देऊ शकतात. हा अर्ज फक्त ऑनलाइन करता येणार असून हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला बिहार लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथून तुम्ही संबंधित इतर माहिती देखील मिळवू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी ही आहे. जर तुम्ही एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी आणि संबंधित क्षेत्रातील पदवी धारण केलेले उमेदवार असाल, तर तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी वयोमर्यादा 21 ते 37 वर्षे आहे.
बिहार लोकसेवा आयोगा (BPSC) ची लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे या पदांसाठी तरुणांची निवड केली जाणार असून अर्ज फी ही सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तसेच, SC, ST, महिला उमेदवार आणि PH प्रवर्गांना फी म्हणून 200 रुपये भरावे लागतील.