Cold Update | नाशिककर गारठले; द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली


Cold Update | यंदा महाराष्ट्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने या हिवाळ्यात थंडी कमी असणार असा अंदाज वर्तवण्यात आल होता. मात्र डिसेंबर महिनाअखेरीस पश्चिमी शीतलहरींमुळे वाढलेल्या वाऱ्यातील वेगामुळे नाशिक शहरात कडाक्याची थंडी सध्या जाणवत आहे. नाशिक शहरातील पारा 13.5 अंश सेल्सियवर पोहोचला असून शहरात 5.6 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Farmers Strike | शेतकरी पुन्हा गाजवणार ‘दिल्ली’

नाशिक जिल्ह्यातील तापमान घसरत असून नाशिक जिल्हयातील कमाल तापमानदेखील घसरल्याने शहरातील गारठा वाढतो आहे. यामुळे आता द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढत आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष काढणी सुरू असून वाढत्या थंडीमुळे द्राक्ष काढणीवर याचा परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान, मालेगाव तालुक्यात 17 अंश सेल्सिअस तर जळगावात 16.8 अंश सेल्सिअस तापमान घसरले आहे.

Agriculture News | शेतकऱ्यांना मदत नाही; आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचं वारकऱ्यांना आवाहन

Cold Update | अचानक थंडी वाढण्यामागे कारण काय?

सध्या जिल्ह्यासह राज्यात अचानक हवेतील गारवा वाढत असून उत्तर भारतात पश्चिम हिमालयीन क्षेत्रामध्ये थंडी पुन्हा वाढलेली आहे. गेल्या दोन दिवसापासून नाशिकमध्ये कमाल तापमान काहीशी घसरन झाल्याने शहरातील गारठ्यात वाढ झाली आहे. नाशिक शहरात आर्द्रताही 98 टक्क्यांदरम्यान असल्याने वाऱ्याचा वेग वाढला आहे.

दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला मिग्जॉम वादळामुळे जिल्हयात अवकाळी बरसला आणि त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात हंगामातील गार वाऱ्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. हिमालयीन क्षेत्रामध्ये पश्चिमी प्रकोपामुळे पुढील येत्या दोन दिवसांत किमान तापमानात अजूनही घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.