PM Narendra Modi | नाशिकच्या सभेत मोदींचे आश्वासन; कांदा उत्पादकांना 15 हजार रुपये देणार?


PM Narendra Modi | निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यांमध्ये सभा व भाषणांच सत्र सुरू झालं असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा महाराष्ट्रात होता. उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये त्यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी भाजपा आणि महायुतीने केलेल्या विकास कामांचा पाढा वाचत विरोधकांवरती जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.

PM Kisan Nidhi | उद्या पंतप्रधान शेतकऱ्यांच्या खात्यावर २,००० रुपये जमा करणार

पीएम किसान योजनेतून मिळणारी रक्कम वाढवणार

यावेळी त्यांनी डबल इंजिन सरकारमध्ये विकासाची गती देखील डबल झाली आहे असं म्हणत योजनांचा लाभ ही वाढला आहे आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान नामे शेतकरी सन्माननिधी मिळत आहे आपले सरकार आल्यास बारा हजार रुपयांची मिळणारी ही 15000 पर्यंत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे तसेच मी कांदा उत्पादकांच्या भावना जाणतो त्यासाठी कांदा निर्यात तिच्या नियमांमध्ये ही बदल केले आहे असे देखील मोदी यांनी सांगितले.

कांदा उत्पादकांच्या भावना जाणतो

नाशिक मध्ये कापूस, सोयाबीन आणि दुधाचे उत्पादन घेतले जाते. पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्रँडिंग वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. इथेनॉल खरेदीसाठी शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षात सुमारे 80 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. यशाचा पैसा पेट्रोल घेण्यासाठी विदेशात जात होता. तोच पैसा माझ्या देशातील शेतकऱ्यांना मिळत आहे. येथील कांदा शेतकऱ्यांच्या भावना मी जाणून आहे. त्यामुळे कांद्याची निर्यात सुलभ करण्यासाठी धोरणात बदल करण्यात आली आहे.

PM Kisan Sanman Yojna | पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता कधी मिळणार..?

विकासासाठी महायुतीचे सरकार स्थापन करणे गरजेचे

आज महाराष्ट्रात उज्वला योजने अंतर्गत 50 लाखांहून अधिक महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. जलजीवन अभियानांतर्गत राज्यातील एक पूर्णांक 25 कोटी हून अधिक घरांमध्ये नळाच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सुमारे सात कोटी गरजूंना दरमहा मोफत रेशन मिळत आहे. राज्यातील 26 लाखांहून अधिक गरिबांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनांमार्फत अजूनही काम सुरू रहावे यासाठी पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणे गरजेचे आहे.” असेही त्यांनी यावेळी सांगितले. (PM Narendra Modi)