सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथील सुनिल आहेर खाजगी कृषी मार्केटमध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लाल कांदा खरेदीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य खाजगी बाजार सहकारी महासंघाचे उपसभापती सुनिल आहेर, माजी जि. प. सदस्या डॉ. नुतन आहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी खर्डे येथील कांदा उत्पादक शेतकरी गोरख जाधव यांच्या कांद्यास सर्वोत्तम ५१५१/- प्रती क्विंटल बाजारभाव मिळाला. तर सरासरी ३६०० /- प्रति क्विंटल भाव होता.
Deola | देवळ्यात चक्क कांद्याने भरलेले ट्रॅक्टर लंपास; नागरिकांमध्ये खळबळ
लाल कांद्याचे उत्पादन उशिराने
तालुक्यात गेल्या वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती. यावर्षी तालुक्यातील पश्चिम भागासह सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावली आहे. परतीच्या पावसाने लाल कांदा रोपांचे नुकसान झाले आहे. यामुळे लाल कांद्याचे उत्पादन उशीरा येणार आहे. तरीदेखील आज आहेर खाजगी कृषी मार्केट मध्ये 22 वाहनांमधून एकूण 213 क्विंटल नवीन लाल कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता.
Deola | देवळा बाजार समितीच्या उप सभापतीपदी शिवाजी आहिरे बिनविरोध
शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त
लाल कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याप्रसंगी मार्केटचे संचालक ललित निकम, प्रफुल्ल आहेर, नमस्ते उद्योग समूहाचे अजय देशमुख, कांदा व्यापारी सिद्धार्थ भुतडा, आप्पासाहेब आहेर, दत्तु बछाव, सचिन निकम, गोकुळ सुर्यवंशी, गणेश भदाने, सुशांत गुंजाळ, शंतनु मोरे, प्रशांत शिंदे, दादा आण्णा, गणेश देवरे, भैय्या पवार, केतन आहेर, मयुर आहेर, तुषार आहेर, शेतकरी तुळशीराम वाघ, सचिन खैरनार, राजेंद्र गुंजाळ, नंदू भामरे, हिरामण निकम, सागर मोहन, बापू निकम, कर्मचारी भूषण पवार, तुषार पवार, सतिश कचवे, जयेश पगार आदी उपस्थित होते. (Deola)