सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप सभापतीपदी महालपाटणे येथील जेष्ठ संचालक शिवाजी दोधा आहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बाजार समितीचे मावळते उप सभापती अभिमन पवार यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने या रिक्त पदाच्या जागी गुरुवारी (दि.२२) रोजी दुपारी १२ वाजता समितीच्या सभागृहात सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व सर्व संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली. यावेळी उपसभापती पदासाठी जेष्ठ संचालक शिवाजी आहिरे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सर्वानुमते त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांना सूचक म्हणून अभिमन पवार यांनी तर अनुमोदन म्हणून विजय सोनवणे यांनी स्वाक्षरी केली. (Deola Bajar Samiti)
Deola | शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी काँग्रेसचे देवळ्यात लाक्षणिक उपोषण
याप्रसंगी सभापती योगेश आहेर, माजी सभापती केदा आहेर आदींसह संचालक सर्वश्री भाऊसाहेब पगार, शिवाजीराव पवार, अभिजित निकम, सौ.धनश्री आहेर, विशाखा पवार, दिलीप पाटील, दिपक बच्छाव, सौ.रेश्मा महाजन, शाहू शिरसाठ, भास्कर माळी, सौ. शितल गुंजाळ, संजय शिंदे, निंबा धामणे, भावराव नवले, सचिव माणिकराव निकम, उपसचिव मयूर आहेर आदी व कर्मचारी उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसभापती शिवाजी आहिरे यांच्या निवडीचे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत अभिनंदन केले.(Deola Bajar Samiti)