Weather Update | परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने तडाखा बसला आहे. तर आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर कायम राहणार असून कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
Weather Update | राज्यात आज पावसाचा यलो अर्लट
संध्याकाळच्या वेळेस पावसाचा जोर अधिक
ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे राज्यामध्ये सध्या उन्हाचा चटका काहीसा कमी झाला असून बुधवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळपासून 24 तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चा अंकी 34.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. कमाल तापमानात घट होत असली तरी उन्हाचा चटका कायम असून दुपारपर्यंत जोरदार वादळी वारे, विजांसह वाळीव पावसाला सुरुवात होते. सायंकाळ नंतर पावसाचा जोर वाढतो आहे.
आज देखील राज्यभर जोरदार पावसाचा अंदाज
तर हवामान विभागाकडून राज्यात आज देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून कोकणातील पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, नंदुरबार, धुळे, पुणे जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात जोरदार वादळीवाऱ्यांचा पावसाचा अंदाज असून विदर्भात विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. (Weather Update)
Weather News | आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट
* मुसळधार पावसाचा रेड अलर्ट: नाशिक, पालघर
* अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट: मुंबई, ठाणे, नंदुरबार, रायगड, धुळे, पुणे
* जोरदार पावसाचा येलो अलर्ट: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जळगाव, सातारा, नगर, कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर
* वादळी वारे आणि विजांसह पावसाचा येलो अलर्ट: परभणी, हिंगोली, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.