Agro News | केळीच्या आवकीत घट; सणासुदीमुळे उठाव कायम


Agro News | सध्या राज्यामध्ये सणासुदीचे वातावरण असल्यामुळे फळा बाजारात मागणी आहे. खानदेशमध्ये दर्जेदार निर्यातक्षम केळीला शिवारात किंवा थेट खरेदीत कमाल 3200 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे. तर 2100 प्रतिक्विंटल असा किमान दर मिळत असून आवक कमी झाली आहे तर, उठाव वाढला आहे.

Agro News | कर्नाटकच्या कांद्याची आवक वाढली; दरांमध्ये चढ-उतार??

जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, जळगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, यावल भागात दर्जेदार केळी आहेत. तर रावेर, मुक्ताईनगर भागात केळीची आवक अल्प आहे. धुळ्यामधील शिरपूता देखील केळीची आवक कमी आहे.

Agro News | कर्नाटकच्या कांद्याची आवक वाढली; दरांमध्ये चढ-उतार??

केळीची आवक कमी मात्र अन्य बाबींमुळे उठाव

तर नंदुरबार जिल्ह्यातही केळीची आवक अत्यल्प असून खानदेशात मिळून रोज 80 ट्रक केळीची आवक होत आहे. या आवकीत मागील काही दिवसांत सुमारे 15 ट्रकने घट झाली असून दुसरीकडे सणासुदीसह, अन्य बाबींमुळे केळीला उठाव आहे. त्याचबरोबर खानदेश लगत मध्य प्रदेशात देखील केळीची आवक घटली असून बऱ्हाणापुरातही केळीची आवक 70 ते 75 ट्रक प्रतिदिन आहे. 2950 हा तेथील कमाल दर असून मागील सात ते आठ दिवसात केळी दरात किंचित सुधारणा झाली आहे. (Agro News)