Weather News | गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात सतत बदल होत होते. राज्याच्या काही भागात थंडी काही भागात ऊन तर काही भागात पाऊस असे संमिश्र वातावरण पाहायला मिळत होते. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या ज्यामुळे तापमानात हा मोठा बदल पाहायला मिळाला होता.
Weather Forecast | आज राज्याच्या किमान तापमानात घट; गारठा वाढणार
तापमानात चढ-उतार कायम
आय.एम.डी.च्या अहवालानुसार सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दक्षिणेतील काही राज्यांमध्ये पावसाचे वातावरण कायम राहणार असून तिरुपती, तमिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाची शक्यता नसून हवामानात बदल झाला आहे. राज्याच्या काही भागातून पावसाने माघार घेतली असून उर्वरित राज्यात तापमानात चढ-उतार कायम आहे.
Weather Forecast | थंडीची लहर ओसरली; आज दक्षिण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार
कोकणात संमिश्र वातावरण राहणार
पावसाच्या माघारीनंतर पुन्हा एकदा थंडीने जोर धरला असून मुंबईचा पारा देखील काहीसा खालावला आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर राज्यातील तापमानात मोठी घट होताना दिसत असून बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा 20 अंशांच्या खाली घसरला आहे. दरम्यान आज राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात पुढील काही दिवस संमिश्र वातावरण राहणार आहे. तर ढगाळ हवामानाचा फटका शेती पिकांना बसत आहे. (Weather News)