Weather Forecast | राज्यात थंडीचा कडाका कायम; जेऊर येथे हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद


Weather Forecast | राज्यात थंडीचा कडाका वाढला असून मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. तर जेऊर येथे यंदाच्या हंगामातील सर्वात निच्चांकी 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून आज दिनांक 30 नोव्हेंबरपासून किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज आहे. तर राज्यात कारखाना कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Weather News | मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार

राज्यात बहुतांश ठिकाणी पारा दहा अंशाच्या खाली

देशाच्या उत्तरेकडील भागात थंडी वाढली असून शुक्रवारी दिनांक 29 नोव्हेंबरपर्यंत देशाच्या सपाट भूभागावरील पंजाब मधील ‘आदमपूर’ येथे नीचांकी 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जेऊर येथे देखील तापमानाचा पारा 6 अंशांपर्यंत घसरला होता. त्याचबरोबर परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ व धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी 8 अंश तापमान नोंदविले गेले असून जळगाव, अहिल्यानगर, पुणे येथे तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली घसरला होता.

तर शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सांताक्रुज आणि रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 33.5 अंश तापमान नोंदविले गेले. तर आज दिनांक 30 नोव्हेंबरपासून राज्यात किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होणार असून किमान तापमानात वाढ होणार असली तरी गारठ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Weather Update | राज्यात कमाल तापमानाचा पारा घसरला; मध्य महाराष्ट्रात आज थंडीची लाट

आज दुपारपर्यंत ‘फिंगल’ चक्रीवादळ धडकणार

बंगालच्या उपसागरात नैऋत्येला वादळी प्रणालीची तीव्रता वाढत असून शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी ही प्रणाली पुद्दुचेरीपासून 340 किमी, नागापट्टणमपासून कामी पूर्वेकडे, चेन्नईपासून 380 किमी आग्नेयकडे होती. तर शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत उपसागरात ‘फिंगल’ चक्रीवादळाची शक्यता आहे. तर आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी हे चक्रीवादळ तमिळनाडू व पुद्दुचेरीदरम्यान असलेल्या महाबलीपुरम व कराईकल जवळच्या किनाऱ्याला दुपारपर्यंत धडकण्याचा अंदाज आहे. तर यादरम्यान, पूर्व किनाऱ्यावर 70 ते 90 किलोमीटर ताशी वेगाने वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Weather Forecast)