Weather Forecast | मॉन्सून ने देशातून निरोप घेतला असूनही महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून वादळी पावसाने तडाका दिला आहे. कमी वेळात होणाऱ्या दमदार पावसामुळे खरिपाची पिके वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तर उद्या 24 ऑक्टोबर रोजी वादळी पावसाच्या संकट दूर होणार असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
Weather News | मॉन्सून परतला तरी पाऊस कायम; हवामान विभागाकडून चक्रीवादळाचा इशारा
परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल
यंदा राज्यात मान्सून हंगामात जोरदार पाऊस आला असून सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात तब्बल 26 टक्के अधिक पावसाचे नोंद झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. यातच मॉन्सून परतल्यानंतरही पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्याच्या विविध भागांमध्ये तुफान वादळी पाऊस कोसळला. या पावसामुळे काढणीला आलेले पीक वाया गेल्याने कांद्यासह रब्बी हंगामातील पिके, भाजीपाला, फळबागांना तडाखा बसल्यामुळे शेतकरी पुरता हवालदार झाला आहे.
Weather Update | राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार
उद्या बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरात, उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले असून या प्रणालीची तीव्रता वाढत असल्याने आज 23 ऑक्टोबर रोजी चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. हे संभाव्य चक्रीवादळ उद्या 24 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा ओडिशाच्या पुरी व पश्चिम बंगालच्या सागर बेटादरम्यान जमिनीला धडकण्याची शक्यता असून, किनाऱ्याला धडकताना हे चक्रीवादळ तीव्र होऊन ताशी 100 ते 120 km वेगाने वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा महाराष्ट्राला धोका नाही. (Weather Forecast)