Weather Forecast | येत्या तीन दिवसात राज्यात पावसाची शक्यता असून वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी पावसात साजरी करण्याची वेळ येणार आहे. 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरच्या दरम्यान, राज्याच्या विविध भागात हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Weather News | पावसाने उघडीप देताच राज्यात थंडीची चाहूल
पुढील दोन दिवस या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
आयएमडीच्या अहवालानुसार, उद्या 30 ऑक्टोबर रोजी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर शहर व घाट परिसर, संभाजीनगर, सातारा घाट व परिसर, परभणी, जालना, चंद्रपूर, हिंगोली, नांदेड, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. तर 1 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, संभाजीनगर, पुणे, परभणी, बीड, नांदेड, लातूर, हिंगोली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ऐन दिवाळीत पावसाचा अंदाज
राज्यात मागील काही दिवसांपासून गुलाबी थंडीची चाहूल लागली असून हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने हवामान कोरडे होत असल्याने सकाळी व रात्री थंडी पडू लागली होती. परंतु ‘दाना’ चक्रीवादळाचा तडाखा ओडिशाच्या किनारपट्टीला बसल्यामुळे हवेतील बाष्प पश्चिमेकडे वळाले त्यामुळे राज्यात ऐन दिवाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुण्यात मध्यरात्री पावसाची हजेरी
पुण्यामध्ये मध्यरात्री पावसाने हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. या पावसाने हवेतील गारवा वाढवला असून दरम्यान, पुण्यात येत्या दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर आज 29 ऑक्टोबर रोजी जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा, मेघकर्जना आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Weather Forecast)