Tech News | हॅकिंगचा कहर वाढला! जगभरातील 260 कोटी लोकांचा पर्सलन डेटा झाला लीक


Tech News | डीपफेक, हॅकिंग आणि डेटा सुरक्षेबाबत सगळीकडे चर्चा सुरू असतानाच अ‍ॅपल कंपनीने एक धक्कादायक रिपोर्ट प्रसिद्ध केलेला असून गेल्या दोन वर्षांमध्ये जगभरातील तब्बल 260 कोटी लोकांचा पर्सनल डेटा लीक झाल्याची धक्कादायक माहिती या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. (Tech News)

Apple’s Massachusetts Institute of Technology मधील प्राध्यापक डॉ. स्टुअर्ट मॅडनिक यांनी केलेल्या एका संशोधनात ही माहिती समोर आलेली आहे. 2013 सालापासून 2022 पर्यंत डेटा ब्रीच होण्याच्या घटनांमध्ये तीनपट वाढ झाली असून हॅकिंग आणि डेटा चोरी हा प्रकार एखाद्या महामारीप्रमाणे पसरत आहे आणि यातून कोणीही सुटत नाहीये असं या संशोधनात म्हटलेलं आहे.

Big News | ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी; शेतकरी-व्यापारी वर्गात नाराजीचे सूर

डाटाला अधिक सुरक्षेची गरज

या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, क्लाऊड स्टोरेजपेक्षा अधिक सुरक्षित अशा सिक्युरिटी सिस्टीमची आपल्याला गरज एसून एंड-टू-एंड इन्क्रिप्शन, अ‍ॅडव्हान्स डेटा प्रोटेक्शन असे फीचर्स वाढवण्याची गरज असल्याचंही यात सांगण्यात आलेलं आहे. अ‍ॅडव्हान्स डेटा प्रोटेक्शन हे फीचर अ‍ॅपल कंपनीने लाँच केलं असताना हे आयक्लाउड या क्लाउड स्टोरेजला अधिक सुरक्षित बनवतं.

Health Tips | हिवाळा आणि आरोग्य..हिवाळ्यात कशी घ्यावी आरोग्याची काळजी?

अ‍ॅपलची सुरक्षाही धोक्यात

काही दिवसांपूर्वीच देशातील काही दिग्गज नेत्यांनी आपले आयफोन हॅक होत असल्याचा आरोप केला होता आणि अ‍ॅपल कंपनीने स्वतःच त्यांना याबाबत माहिती दिल्याचं म्हटलं जात होतं. यासोबतच गेल्या महिन्यात 81.5 कोटी भारतीयांचा डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं वृत्त समोर आलेलं होतं तसेच दोन आठवड्यापूर्वीच ताज हॉटेलच्या 15 लाख ग्राहकांचा पर्सनल डेटाही लीक झाला होता.