‘Kia Sonet Facelift SUV’ 14 डिसेंबरला लॉन्च होणार; अवघ्या 25 हजारांत करा बुकिंग


Kia Sonet Facelift SUV | किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांची दमदार एसयूव्ही कार 14 डिसेंबरला लॉन्च केली जाणार असून कारमध्ये अनके मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे. कंपनीकडून कारचे बुकिंग देखील सुरु करण्यात आलेले आहे. किआ कार उत्पादक कंपनी भारतीय ऑटो क्षेत्रातील विस्तार वाढवण्यासाठी त्यांच्या नवीन कार सादर करत असते. आता किआ त्यांच्या Sonet एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार असून कारमध्ये अनके मोठे बदल केले जाणार आहेत.

Tech News | हॅकिंगचा कहर वाढला! जगभरातील 260 कोटी लोकांचा पर्सलन डेटा झाला लीक

Kia Sonet Facelift SUV कार चाचणी दरम्यान दिसून आली असून कारच्या डिझाईन आणि केबिनमध्ये यावेळी बदल पाहायला मिळाला आहे. कंपनीकडून Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारचे प्री-बुकिंग सुरु करण्यात आलेले आहे. तुम्ही 25 हजार रुपये टोकन रक्कम भरून Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही बुक करू शकणार आहात. जानेवारी 2024 मध्ये किआ त्यांच्या नवीन Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारच्या किमती जाहीर करेल तसेच कार डिलीव्हरी देखील याच महिन्यात सुरु केली जाण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.

नवीन Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये डिझाईन अपडेट्ससह उत्तम लुक, आलिशान इंटीरियर्स आणि विद्यमान इंजिन दिले जाणार आहे. किआने गेल्या काही दिवसांपूर्वी कारचा एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कारचे अपडेटेड फीचर्स पहायला मिळत असून कारच्या केबिनमध्ये प्रीमियम फीचर्स जोडले गेले आहेत. Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये लेव्हल 1 ADAS सुरक्षा फीचर्स देण्यात आलेले आहे.

Big News | ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी; शेतकरी-व्यापारी वर्गात नाराजीचे सूर

रचना-

Kia Sonet Facelift कारमध्ये नवीन LED हेडलॅम्प, L-shaped LED DRL, नवीन टेल लॅम्प्स, अपडेटेड फ्रंट ग्रिल आणि माउंटेड फॉग लॅम्प पाहायला मिळणार आहेत. कारचा लूक आणखी आकर्षक बनवण्यात आलेला आहे.

वैशिष्ट्ये-

Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 10.25 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, तपकिरी रंगाच्या सीट्स आणि रियर आर्मरेस्ट अशी वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. Sonet फेसलिफ्टमध्ये नवीन बोस साउंड सिस्टीम दिली जाणार आहे तसेच 360 डिग्री कॅमेरा आणि हेड अप डिस्प्ले (HUD) फीचर्स देखील दिले जाणार आहेत.