Rain Update | मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. ज्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र आज दुपारी अडीच दरम्यान पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
Weather News | आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट
जोरदार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले
शहरांमधील मेनरोड, सीबीएससह, नाशिक रोड परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. नाशिक रोड परिसरात जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणी साचले होते. तर नाशिक शहरातील काही भागांमध्ये देखील पाणी साचले होते. यादरम्यान, दि. 23 पासून मान्सून परतीच्या प्रवासाला लागण्याची शक्यता असून 24 सप्टेंबर पर्यंत दुसऱ्या आवर्तनातील पावसाची सुरुवात सर्वप्रथम विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात मध्यम तीव्रतेने आणि मुंबईसह कोकण, खानदेश, नगर, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
Weather Update | अखेर मॉन्सून परतीच्या प्रवासाला लागणार
परतीच्या पावसाने धरण क्षेत्रात त सतर्कतेचा इशारा
दिनांक 26 ते 29 सप्टेंबर या काळात नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा व धरण क्षेत्रात पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे, असे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी कळविले आहे. तर दिनांक 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान तिसऱ्या आवर्तनातील चार दिवसात मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, उत्तर नगर, नाशिक, जळगाव, धुळे, जालना, बुलढाणा, अकोला, छत्रपती संभाजी नगर, वाशिम, नागपूर, वर्धा, अमरावती, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.(Agro News)