Rain News | परतीच्या पावसाने राज्यातील विविध भागांमध्ये पुन्हा एकदा हजेरी लावत धुमाकूळ घातला असून नाशिक जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासून खडक होऊन पडले होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. त्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नाशिक शहरातील काही भागांसह ग्रामीण भागामध्ये पावसाने हजेरी लावली.
Rain Update | राज्यात आज पावसाची विश्रांती
भात पिकांसह अन्य पिकाला फटका
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नरसह आदी भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून सिन्नरमधील मुसळगाव एमआयडीसी परिसरात ढगांच्या गडगडाटासह शहरातीलनी नांदूर, शिंगोटे येथे दमदार पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसाने भात पिकांसह ग्रामीण भागातील विविध पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून हा परतीचा पाऊस गहू आणि हरभरा पिकांसाठी वरदान ठरणार आहे. तर रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू आणि हरभरा या पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यात परतीचा पाऊस हा दोन पिकांसाठी फायदेशीर असतो. परंतु सोयाबीन, भाजीपाला, उडीद, तुर, कांदा या पिकांसाठी हा पाऊस नुकसानकारक ठरतो.
तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध भागांमध्ये 9 ते 17 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी सावधानतेचा इशारा देत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद पिकाची काढणी केली आहे, त्यांनी ते झाकून ठेवावे. अन्यथा पावसाने फटका बसू शकतो. असे सांगण्यात आले आहे.
Rain News | आज राज्यात 3 जिल्ह्यांना रेड तर, तर आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर
राज्यातील या भागात पावसाची कोसळधार
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आजपासून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या भागात रोज विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून 12 ऑक्टोबरपासून विदर्भात पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच 12 ते 16 ऑक्टोबरपर्यंत विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय नांदेड, हिंगोली, लातूर, जालना, परभणी, बीड या सहा जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाची शक्यता असून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. (Rain News)