PM Kisan Yojna | भारताच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा भाग म्हणजे कृषी क्षेत्र असून सध्या भारतासह महाराष्ट्रात शेती आधुनिकिकरण तसेच शेतीला तांत्रज्ञानाची जोड देण्याकडे राज्य तसेच केंद्र सरकार भर देत असल्याचं चित्र आहे. यासाठी देशासह राज्यात अनेक योजना राबवल्या जातात. यातच देशातील प्रमुख मानली जाणारी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान निधी योजना ही आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या असून या योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान निधी योजना (PM-Kisan Samman Nidhi Yojna) ही योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजने अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी 6000 रुपये देेशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जोण्यात येते. देसातील अल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान निधी योजना (PM-Kisan Samman Nidhi Yojna) सुरु केलेली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता जारी केला असून विशेष म्हणजे केंद्र सरकारनकडून आतापर्यंत 15 हप्त्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. आता शेतकरी 16 व्या हप्त्याची वाट पाहत असून दरम्यान, एकाच घरात वडील आणि मुलगा हे दोघेही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.
PM Kisan Yojna | एका कुटुंबातील एकाच सदस्याला योजनेचा लाभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान निधी योजने अंतर्गत (PM-Kisan Samman Nidhi Yojna) एकाच कुटुंबातील वडील आणि मुलगा दोघेही पीएम किसान या योजनेचे लाभार्थी होऊ शकत नाही. या योजनेच्या नियमांनुसार, एका कुटुंबातील एकाच सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकतो तसेच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या नावावर शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक असल्याने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता फायदा घेता येणार नाही.
तुम्हाला जर पीएम किसान योजनेशी निगडीत कोणत्याही समस्येचे निवारण करायचे असेल तर ते pmkisan-ict@gov.in वर ईमेलद्वारे संपर्क साधू शकतात तसेच सरकारने पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन क्रमांक – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 जारी करण्यात आलेला आहे.