Onion Rate | गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे उन्हाळा कांदा कांद्याच्या लागवड क्षेत्रात 50 हजार हेक्टरने घट झाली होती. परिणामी उत्पादनात घट झाली. त्यात कांदा काढणीपश्चितता, मान वाढ व वातावरणीय बदलांमुळे कांद्याची साठवणूक क्षमता नष्ट झाली. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत कांदा उत्पादकांनी दिवाळीपर्यंत कांदा कसाबसा टिकवला असून आता जिल्ह्यात प्रमुख कांदा बाजारात आवक घटल्याने मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने कांद्याला सरासरी 5 हजार 500 रुपये दर मिळत असून किमान 1,200 ते कमाल 7,171 रुपये असा दर मिळत आहे.
Onion Garlic Rate | आवक घटल्याने कांदा, लसणाचे भाव तेजीत
दर वाढूनही शेतकऱ्यांना त्याचा काहीही फायदा नाही
तर पाणीटंचाईमुळे गेल्या रब्बी उन्हाळ कांदा हंगामात लागवडीमध्ये पन्नास हजार हेक्टरवर झालेली घट, त्यात तापमान वाढ व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादकता व गुणवत्ता कमी झाली. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली. मात्र सड वाढल्याने कांदा साठा संपून पुरवठा कमी होत असल्याने दरात सुधारणा दिसून आली. पण सध्या शेतकऱ्यांकडे कांदा नसल्याने दर वाढूनही शेतकऱ्यांना त्याचा काहीही फायदा होत नाही. एप्रिल महिन्यात नवीन उन्हाळा कांद्याची काढणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला सरासरी 1200 ते 1300 रुपये दर मिळत होते. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत दराचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला नाही. ऑगस्टनंतर टप्प्याटप्प्याने आवक कमी झाली असून दिवाळीपर्यंत आवक बऱ्यापैकी होती. मात्र दिवाळीनंतर आवक कमी झाल्याने दरात सुधार झाला आहे.
Onion News | कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; किसान एक्सप्रेस 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू रहाणार
प्रमुख बाजारपेठेतही कांद्याची आवक मंदावली
सध्या पिंपळगाव बसवंत, लासलगाव अशा प्रमुख बाजारात आवक कमी झाली असून कसमादे भागातील कळवण, सटाणा, उमराणे यांसह येवला बाजारात आवक होत आहे. अनेक शेतकरी प्रामुख्याने प्रयोगशीलतेने कांद्याची साठवत केल्याने दिवाळीनंतर देखील शेतकरी कांदा टप्प्याटप्प्याने विक्री करीता आणत आहेत. मात्र बहुतांश बाजारात उन्हाळ कांद्याची आवक कमी झाली तर नवीन खरीप लाल कांद्याचे आवक देखील अपेक्षित नसल्याची स्थिती आहे. तर खरीप कांद्याची उपलब्धता कमी व उन्हाळ कांद्याचा साठा अंतिम टप्प्यात आला असून कांद्या बियाणे उत्पादक कंपन्यांकडून चांगल्या प्रतवारीच्या कांद्याला पसंती मिळत आहे. (Onion Rate)