Onion News | सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण


Onion News | जुन्या कांद्याला सोलापूर जिल्ह्यात चांगला भाव मिळत असून मागील दोन दिवसात सोलापूर बाजार समितीत 654 वाहनांनी कांद्यांची आवक झाली आहे. ज्यामुळे जुन्या कांद्याला प्रतिक्विंटल 3000 ते 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. तर नवीन कांदा मात्र सोलापूर बाजार समितीत मंगळवारी 2 ते 4 हजारापर्यंत विकला गेला. पावसाने भिजलेल्या कांद्याला प्रति किलो 10 ते 15 रुपयांचा दर मिळाला आहे.

Onion News | आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचे लिलाव बंद राहणार

सोलापूर बाजार समितीमध्ये नाशिक, धाराशिव, पुणे, नगर जिल्ह्यांमधून जुन्या कांद्याची आवक होत असून, मागच्या दोन दिवसांमध्ये आवक झालेल्या 325 वाहनांपैकी 200 वाहने जुन्या कांद्याची होती. तर 125 वाहनांमध्ये नवीन कांद्याचे आवक झाली होती. फलटण, म्हसवड, कर्नाटक, माळशिरस, कलबुर्गी, विजयपूर, बागलकोट येथून नवीन कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे.

दर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

त्यामुळे सोलापूर बाजार समितीत आवक वाढल्याने दरातही काहीशी घसरण झाली असून 5 हजार 500 रुपये क्विंटलने विकला जाणारा कांदा, आता आवक वाढल्यामुळे 3 ते 4 हजार रुपयांपर्यंत विकला जातोय. सोलापूर जिल्ह्यातील नवीन कांदा बाजारात यायला अजून महिन्याचा अवधी असून त्यापूर्वीच दर कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता आता वाढू लागली आहे. त्यातच पुन्हा शेतकऱ्याला विकलेल्या कांद्याचे रोखीने बिल मिळत नाही. किमान 15000 रुपयांपेक्षा जास्त बिल झाल्यास त्यांना पंधरा दिवसांची तारीख टाकलेला धनादेश दिला जात असल्याची खंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Onion News | दिवाळीपर्यंत कांदा शंभरी गाठणार; आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ

कर्नाटकातील कांदा बंगळुरू बाजारात

मागील दोन दिवसांपासून सोलापूर बाजार समितीत 654 पाहणे कांदा आला असून यामध्ये कर्नाटकामधून कांद्याची आवक वाढली आहे. मात्र कर्नाटकातील बंगळुरू राज्यात एक हजारहून अधिक वाहने गेल्याने सोलापूर बाजार समितीमध्ये आवक काहीशी कमी होणार आहे. तर सध्या नवीन कांद्याला सोलापूर बाजार समिती प्रतिक्विंटल 3500 ते 4000 रुपयांपर्यंत दर मिळत असून सरासरी 2 हजार रुपये दर आहे. तर येत्या काळात कांद्याच्या आवक वाढली तरी देखील कांद्याचे दर चांगले राहतील असा अंदाज बाजार समितीतील अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आला आहे. (Onion News)