Onion News | नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली असून श्रीलंका सरकारने कांद्यावरील शुल्क कमी केला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यात आयात शुल्क 30 टक्क्यांवरून 10 टक्के केल्यामुळे श्रीलंकेत आता कांदा निर्यात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकसह देशभरात सुमारे 9 टक्के कांदा एकट्या श्रीलंकात निर्यात होत असतो.
Onion Rate | उन्हाळ कांद्याची आवक घटली; नाशिक जिल्ह्यात आज 16 हजार क्विंटल कांद्याची आवक
यंदा खरीप कांद्याची सर्वाधिक लागवड चांदवड तालुक्यात झाली आहे
नाशिक जिल्हा कांद्याचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यामध्ये यंदा खरीप करण्याची लागवड 60 हजार 90.70 हेक्टर क्षेत्रावर झाली असून यामध्ये सर्वाधिक कांदा लागवड चांदवड तालुक्यात झाली आहे. तर येवला तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Onion Rate | आज राज्यातील बाजार समितीत 1 लाख क्विंटल कांद्याची आवक; काय मिळाला दर…? वाचा सविस्तर
साधारणतः हंगामातील कांद्याची लागवड ही जुलै सप्टेंबरमध्ये होत असते, कांद्याची काढणी ऑक्टोबर उत्तरार्धात सुरू होऊन डिसेंबर पर्यंत चालू राहते. तर खरीप कांद्याची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये सुरू होत असून कांदा काढणी जानेवारीमध्ये सुरू होते. मलेशिया, युएई, श्रीलंका, कुवेत, बांगलादेश या देशांसह 10 प्रमुख देशांमध्ये कांद्याची निर्यात होत असते. एकूण परकीय चलनातून 91 टक्के चलन हे 10 देशांकडून भारताला मिळत असते. (Onion News)