Onion News | नाशिक शहरात कांद्याची उपलब्धता कमी असल्यामुळे किरकोळ कांदा विक्री दरात सुधारणा झाली आहे. त्यामुळे कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्याकरिता केंद्र सरकारने पुन्हा भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत खरेदी केलेला कांदा बाजार आणण्यास सुरुवात केली आहे.
Onion News | कांद्याचे दर अजून किती दिवस तग धरणार?
आतापर्यंत 2520 कांदा दिल्लीला रवाना
त्यानुसार, ‘एनसीसीएफ’ व ‘नाफेड’ या दोन संस्थांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्याचे 840 टन कांदा शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी रेल्वेच्या माध्यमातून किशनगंज नवी दिल्ली येथे पाठवण्यात आला आहे. लासलगाव येथील ‘एनसीसीएफ’ व ‘नाफेड’च्या गोदामातून आतापर्यंत दिल्लीकरिता 2,520 कांदा पाठविण्यात आला आहे. तर 480 टन कांदा चेन्नई येथील कोरूकिपिटू येथे पाठवून कांद्याच्या वाढलेल्या दरात दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Onion Rate | दर स्थिरीकरणासाठी केंद्राकडून बफर स्टॉकमधील कांदा बाजारात
लासलगाव बाजार समितीत काय मिळतोय दर?
कांद्याने किरकोळ दरात 80 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला असून गेल्या आठवड्यात साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आल्याने कांदा दरात 1000 रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. उन्हाळ कांद्याची आवक कमी झाल्याने काही आठवड्यात कांदा भावा तेजीत पाहायला मिळाली होती. दरम्यान, लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान 1,600 तर कमाल 4,900 व सरासरी 4,500 तसेच उन्हाळा कांद्याला किमान 2,900 तर सरासरी 4,700 भाव मिळाला. शिवाय बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल ओडिशा, आसाम या ठिकाणी कांदा रस्ते मार्गाने पोहोचवला जात आहे. (Onion News)