Onion News | सतत पडणाऱ्या पावसामुळे कांदा पिकावर सध्या करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 40 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप कांदा पिकाला बसला आहे.
Onion News | इजिप्त आणि तुर्कीमधून आयात केलेल्या कांद्याच्या गुणवत्ता व दरात ताळमेळ नाही
नासक्या कांद्याच्या अवस्थेमुळे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली
सोलापूर जिल्ह्यात कांदा पिकाची लागवड झाली असून गेल्या वर्षी कांदा पिकाचे दर तेजीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कांद्याचे लागवड क्षेत्र वाढवले. यावेळी देखील सुरुवातीला कांद्याचे दर तेजीत होते परंतु सततच्या पावसामुळे कांदा जागेवरच नासू लागल्यामुळे बाजारपेठेत खराब कांद्याची आवक वाढू लागली परिणामी बाजारपेठेत कांद्याच्या दरात घसरण झाली असून नासक्या कांद्याच्या आवकेमुळे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
Onion News | सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; सरासरी भावात 700 रुपयांनी घट
अद्याप पंचनामे नाहीत
पिळरोग व करपामुळे कांद्याची प्रत खालावू लागली आहे. असे असून देखील कृषी विभाग व महसूल विभागाने अद्याप कांदा पिकाची पाहणी करून पंचनामे केलेले नाहीत. सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे नत्राचे प्रमाण वाढले असून कांदा पिकाच्या माना लांबणे व पातीवाकडे तिकडे होऊन कांदा पिळरोगाला बळी पडला आहे. तर रोगामुळे काही प्लॉटमध्ये कांद्याचा गुड्डाच तयार झाला नाही. हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकाला करपा रोगापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी बुरशीनाशकांची फवारणी केली आहे. असे असून देखील कांदा पीक शेतकऱ्यांच्या हाताला लागले नाही. (Onion News)